Maharashtra Municipal Election Results  pudhari photo
नागपूर

Maharashtra Municipal Election Results | मतांचा घसरलेला टक्का नेमका कुणाला धक्का देणार? दहाही झोन मतमोजणीसाठी सज्ज

Maharashtra Municipal Election Results | नागपूरचा कमी टक्का, कुणाला धक्का? दहाही झोन सज्ज

पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकांमध्ये नागपूर शहरात कमी मतदान टक्केवारीची नोंद झाली असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. दहाही झोनमध्ये निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज असली तरी मतदारांचा कमी प्रतिसाद कुणाला फायदेशीर तर कुणाला धक्कादायक ठरणार, याचा अंदाज बांधला जात आहे. या निवडणुकीचे निकाल नागपूरच्या स्थानिक राजकारणाची पुढील दिशा ठरवणारे ठरू शकतात.

Maharashtra Municipal Election Results nagpur updates 2026

नागपूर - 38 प्रभागात 151 नगरसेवकांसाठी गुरुवारी झालेल्या महापालिका निवडणुकीत ५१ 38% मतदान झाल्याचे पुढे आले आहे. अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरात भाजप, शिवसेना महायुती सत्ता कायम ठेवेल असे दिसत असले तरी हा मतांचा घसरलेला टक्का नेमका कुणाला धक्का देणार ते आता काही वेळातच स्पष्ट होणार आहे. भाजपने विजयाचा जल्लोष साजरा करण्याची पूर्वतयारी सुरू केली आहे.

उमेदवार, समर्थक निकालासाठी सज्ज झाले आहेत. मतमोजणीसाठी शहरातील दहाही झोन, मतमोजणी केंद्र सज्ज झाले आहेत. 3004 मतदान केंद्रावरून ईव्हीएम रात्री उशिरा पोहचल्या. 4009 कंट्रोल युनिट आणि 10 हजार 928 बॅलेट युनिटची मदत घेण्यात आली. आज शुक्रवारी 16 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होईल. प्रत्येक निवडणूक निर्णयाधिकारी यांच्याकडे 20 टेबल ईव्हीएमसाठी तर पोस्टल, बॅलेटसाठी ४ टेबल असणार आहेत.

प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक सहाय्यक नियुक्त करण्यात आलेले असून सर्व प्रभागांची एकावेळी मतमोजणी सुरू होणार असल्याने पहिला निकाल साधारणतः एक वाजेपर्यंत अपेक्षित आहे. एकाच वेळी पोस्टल आणि ईव्हीएमची मतमोजणी केली जाणार आहे. पोलीस बंदोबस्त आणि निवडणूक अधिकारी कर्मचारी असे 16 हजारावर मनुष्यबळ यासाठी तैनात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT