Vijay Wadettiwar Pudhari
नागपूर

Vijay Wadettiwar : तहसीलदारांवर माफियाचा हल्ला, जनतेचा अंत पाहू नका !

काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून सरकारवर टीकास्त्र

पुढारी वृत्तसेवा

Mafia Attacks Tehsildar—Do Not Test the Public's Patience Congress Legislative Party Leader Vijay Wadettiwar

नागपूर : पुढारी वृत्तसेवा नागपूरच्या कुही तालुक्यात महसूल अधिकाऱ्यांवर मुरूम माफियांचा हल्ला होतो, तहसीलदाराला जेसीबीला लटकवून नेण्याची हिंमत होते आणि सरकार मात्र शांत बसून तमाशा पाहते! जनतेच्या सहनशीलतेचा अंत सरकारने पाहू नये.. अन्यथा याचे खूप गंभीर परिणाम होतील असा इशारा काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

कुही तालुक्यात ही घटना घडली. वडेट्टीवार म्हणाले, ज्या राज्यात प्रशासनालाच गुंडांची भीती वाटते, त्या राज्यात सामान्य जनतेने न्यायाची अपेक्षा तरी कोणाकडून करायची? कायदा आता संविधानाने नाही, तर माफियांच्या दादागिरीने चालतोय का? असा प्रश्न त्‍यांनी उपस्थित केला.

महिला असुरक्षित, चिमुकल्या मुली असुरक्षित, अधिकारी असुरक्षित… आणि सत्ताधारी मात्र फक्त जाहिरातींमध्ये “सुरक्षित महाराष्ट्र” दाखवण्यात व्यस्त! असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

राज्यात अनेक नद्यांच्या पात्रांमध्ये अवैधरित्‍या वाळू उत्‍खणनाचे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. तहसिलदार तसेच पोलिसांकडून कारवाईसाठी प्रयत्‍न होत असताना वाळू माफियांकडून त्‍यांच्यावरही वाहन घालण्याचे प्रकार समोर येत असतात. त्‍यामुळे याची गांभीर्याने दखल राज्य शासनाने घ्यावी अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT