Sunita Jamgade Warrant Issued Nagpur Police
नागपूर: भारत - पाकिस्तान सीमा रेषा ओलांडून पाकिस्तानात अवैधरित्या प्रवेश करणाऱ्या आणि हेरगिरीचा संशय असलेल्या सुनिता जामगडेला अखेर ताब्यात न घेता कारगिल पोलीस नागपुरातून परत गेले आहेत. यामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुनिताचा मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
४ मेरोजी सुनिता मुलाला घेऊन श्रीनगरला गेली तिथून ती सोनमर्ग व त्यानंतर कारगिलला गेली. या दरम्यान भारताची सीमारेषा ओलांडून त्यांनी पाकिस्तान प्रवेश केला. पाकिस्तानी रेंजर्स करून आठ दिवस चौकशी केली. तर मनोरुग्ण असल्याचे कळल्यानंतर तिच्या अटकेसाठी काश्मीर पोलीस तीन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये धडकले. प्रोडक्शन मराठी करण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली. मात्र, कारगिल पोलिसांनी स्थानिक न्यायालयाच्या प्रोडक्शन वॉरंटची प्रत न आल्याने त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले.