Nagpur Railway News
नागपूर - हावड़ा अहमदाबाद सुपरफास्ट एक्सप्रेसवर नागपूर येथून निघाल्यानंतर दगडफेकीची घटना आज शनिवारी सायंकाळी घडली. कोच B2 मध्ये ही घटना घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी माध्यमांशी बोलताना दिली. यामुळे रेल्वे प्रवाशांच्याही सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मध्यवर्ती रेल्वे स्थानकावरून निघाल्यानंतर दाटीवाटीच्या इतवारी रेल्वेस्थानक तसेच कामठी, कन्हान परिसरात अनेकदा धावत्या रेल्वेवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. नागपूर बिलासपूर वन्देभारत एक्सप्रेस वर देखील दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने आजच्या घटनेत देखील दोन कोचवर दगडफेक झाली असली तरी कुणालाही इजा झालेली नाही. काही वेळात गाडी कामठी रेल्वे स्थानकावरून रवाना झाली.नंतर रेल्वे पोलिस चौकशीसाठी पोहोचले.