अहमदाबाद - हावडा एक्सप्रेसवर दगडफेक करून तरुण पसार

कामठी रेल्वे स्थानक परिसरात धावत्या रेल्वेवर दगडफेकीची घटना
Stone pelting on Ahmedabad - Howrah Express
अहमदाबाद - हावड़ा एक्सप्रेसवर दगडफेक करून तरुण पसार File Photo
Published on
Updated on

नागपूर -अहमदाबाद

हावड़ा एक्स्‍प्रेसवर आज (शुक्रवार) काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याने वातावरण तापले आहे. अचानक झालेल्या या दगडफेकीने प्रवाशांना देखील नेमके काय होत आहे हे काही काळ समजले नाही. मात्र, पोलिस घटनास्थळी पोहचेपर्यंत हे तरुण पसार झाले होते. (Ahmedabad - Howrah Express)

नागपूर जिल्ह्यातील कामठी रेल्वे स्थानक परिसरात ही धावत्या रेल्वे गाडीवर दगडफेकीची घटना घडली. काही वेळातच कामठी रेल्वे स्टेशन येत असताना हा प्रकार घडल्याने यामागे कोण असावेत या विषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. रेल्वे स्थानकावर येण्यापूर्वीच अहमदाबाद - हावड़ा एक्सप्रेस 15 मिनिटे थांबविण्यात आली. काही वेळ थांबून सर्व काही ठीक असल्याची खात्री पटल्यानंतर ही गाडी पुढील प्रवासाला निघाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news