Nagpur Rain : नागपुरात मुसळधार पाऊस, सखल भागात शिरले पाणी Pudhari Photo
नागपूर

Nagpur Rain : नागपुरात मुसळधार पाऊस, सखल भागात शिरले पाणी

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : पुढारी वृत्‍तसेवा

नागपुरात गेल्‍या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे यामुळे सखल भागातील नागरी वस्‍त्‍यांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे आज (शनिवार) उशिरा शाळांना सुट्टी जाहीर केली. यामुळे पालकांनी संताप व्यक्‍त केला. दरम्‍यान मुसळधार पावसाचा हवाई सेवेवरही परिणाम झालेला आहे. (Nagpur Rain)

नागपूर शहर व जिल्ह्यात आज (शनिवार) सकाळपासून विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. नागपुरात गेल्या तीन तासात सरासरी 90 मिलिमीटर पाऊस झाला. अजून 3 तास जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्‍याकडून देण्यात आला आहे. मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर तर प्लॅटफॉर्मवरून पाणी वाहत आहे. रुळांवरही पाणी साचले. शहरातील सर्वच विधानसभा मतदारसंघात कमी अधिक प्रमाणात उंच सिमेंट रस्ते, पाण्याचे आऊटलेट नसल्याच्या तक्रारी ऐकायला मिळाल्या. अनेक सखल भागामध्ये पाणी शिरल्याने अनेकांना आज ऑफिसमध्ये जाण्याच्या वेळीच तारांबळ उडाली.

सिमेंट रस्त्याच्या कामामुळे उपराजधानीत जागोजागी घरांमध्ये पाणी शिरण्याचा तक्रारी पुढे येऊ लागल्या. पहाटेपासून नागपुरात जोरदार पाऊस सुरू झाला. हवामान खात्याने तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतरही गाफील असलेल्या प्रशासनाने मुले शाळेत गेल्यानंतर सुटी दिल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. अनेक शाळांनी यात पुढाकार घेत मुलांना सुटी जाहीर केली, पालकांनी मुलांना घेऊन जावे असे सांगितले. अखेर सोशल मीडियावर या संबंधीचे मेसेज व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने शिक्षणाधिकारी यांचे मार्फत आज सुट्टी जाहीर केली.

18 ते 21 दरम्यान नागपूर विभागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. शुक्रवारी नागपूर जिल्ह्यातील उमरेड, सिरसी, हिंगणघाट रस्ते पावसामुळे बंद झाले. हवामान विभागाने पुढील 3 तासात भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर ,वर्धा व यवतमाळ ह्या जिल्हयात काही ठिकाणी वीजेच्या कडकडाटासह अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

शुक्रवारी रात्री नागपूर विभागात पडलेला पाऊस ब्रम्हपुरी 189.6 मिमी, वर्धा 112,6 भंडारा 80, गडचिरोली 69,8,गोंदिया 50,6, चंद्रपुर 26,4 असा असून शुक्रवार १९ जुलैच्या सकाळी ८.३० ते शनिवार २० जुलैच्या सकाळी ८.३० या २४ तासात नागपुरात ९१.३ मिमी पाऊस झाला. दरम्यान, शनिवार २० जुलैच्या पहाटे ५.३० ते सकाळी ८.३० या तीन तासात ८१.८ मिमी पाऊस झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT