माजी खासदार दत्ता मेघे यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. Pudhari Photo
नागपूर

माजी खासदार दत्ता मेघे यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’प्रदान

पुढारी वृत्तसेवा

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ नागरिक महामंडळ (विदर्भ) नागपूरतर्फे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्‍य साधून माजी खासदार दत्ता मेघे यांना ‘ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. प्रकृती अस्‍वास्‍थ्‍यामुळे त्‍यांच्‍या निवासस्‍थानी जाऊन त्‍यांना ज्येष्ठ नागरिक महामंडळ (विदर्भ) अध्यक्ष प्रभुजी देशपांडे यांच्‍या हस्‍ते स्‍मृतिचिन्‍ह प्रदान करण्‍यात आले. यावेळी महामंडळाचे सचिव अ‍ॅड. अविनाश तेलंग व अरविंद शेंडे, सुधीर सांगोळे, विनोद व्‍यवहारे, उल्‍हास शिंदे, ईश्‍वर वानकर, कमलाकर नगरकर यांची उपस्थिती होती.

जगनाडे चौक, नंदनवन येथील अनसूया माता सभागृहात झालेल्‍या मुख्‍य कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात विदुषी डॉ. रमा गोळवलकर उपस्थित होत्‍या. प्रा. प्रभुजी देशपांडे, अ‍ॅड. अविनाश तेलंग, विनोद व्यवहारे, कोषाध्यक्ष डॉ. अरविंद शेंडे यांची उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठांना मार्गदर्शक ठरणार्‍या ‘सेवा, सुविधा’ या पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

अविनाश तेलंग यांनी, ज्येष्ठांचे प्रश्न आता रस्त्यावर उतरल्याशिवाय सुटणार नाही, असे मत मांडले.

राजेश जोशी यांच्या संयोजनात यावेळी ‘सुरसंगम’च्या कलाकारांनी सुंदर गाणी सादर केली. यात मनीषा जावलीकर, वाचासुंदर, विजय पांडे, राजू देशपांडे, अरुण नलगे, लीना, रोहिणी पाटणकर, राजेश जोशी आदी गायकांनी विविध सुमधूर गीते सादर केली. कार्यक्रमाचे निवेदन मंजूषा सदावर्ती यांनी केले तर मनोहर धाबेकर यांच्या बासरीच्या मंजूळ सुरात सरस्वती पूजन झाले.

कार्यक्रमाचे संचालन मोनिका वारोतकर व कमलाकर नगरकर यांनी आभार मानले. यावेळी ज्ञानेश्वर पांडे, सुधीर सांगोळे, राजेंद्र कळमकर, सुनील तांदुळकर, राजाभाऊ अंबारे, प्रकार निरकुटे, उल्हास शिंदे, प्रमोद अंजनकर, मनोहर वानखेडे, बाबूराव लिखार, दयाराम कुरस्कर, चंद्रकांत पाटील, फलके, अशोक बेलसरे, संध्या कळमकर, अंजली पात्रीकर, किशोर खंडाळे, विनोद व्यवहारे, अशोक बांडाणे, भरत महाशब्दे, विलास बांगरे, निशिकांत लघाटे, अविनाश जोशी, विजय शेंडे, कॅप्टनं विंचूरकर, रेखा ढोरे, निलिमा बोकारे, मंजुषा तेलंग,मीना दाते आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT