फडणवीस म्हणाले, खडसेंविषयी गणेश उत्सवानंतर निर्णय! file photo
नागपूर

फडणवीस म्हणाले, खडसेंविषयी गणेश उत्सवानंतर निर्णय!

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे काय म्हणाले हे मी ऐकलेलं नाही.मात्र त्यांच्या संदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतला आहे, तो निर्णय आम्हा सर्वांना मान्यच आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून गणेश उत्सवानंतर योग्य तो निर्णय केला जाईल असे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शनिवारी माध्यमांशी बोलताना दिले.

पोर्ट ब्लेयर नामांतरण संदर्भात बोलताना गुलामीच्या चिन्हांना मिटवलेच पाहिजे आणि गुलामाच्या चिन्हांना मिटवण्याचे हेच काम मोदी सरकार करीत असल्याने त्यांना मी धन्यवाद देतो या शब्दात समर्थन केले.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा मुंबईला येत आहेत.त्यात आमची पक्षांतर्गत छोटी बैठकही होणार आहे.मात्र सध्या महत्वाचे गणेश पर्व सुरू आहे त्यामुळे गणेशाचे ते दर्शन घेणार आहेत असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. दरम्यान,पंतप्रधान मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळावा म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. अर्थातच या सगळ्या निर्णयाचा फायदा सोयाबीन,कांदा, बासमती धान उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे यावर फडणवीस यांनी भर दिला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT