सांगली : पत्त्याच्या क्लबवर छापा; ७ जणांना अटक, सव्वा अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

विट्याजवळ पत्त्याच्या क्लबवर छापा; ७ जणांना अटक, सव्वा अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त
Sangli News
नेवरी हद्दीत सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर काल शुक्रवारी (दि. १३) दुपारी साडे चार वाजता छापामारी केली.Pudhari News Network
Published on
Updated on

विटा : नेवरी हद्दीत सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर काल (दि. १३) दुपारी साडे चार वाजता छापामारी केली. यांत रोख रकमे सह सात संशयितांकडून ६ दुचाकी गाड्या आणि एक चारचाकी गाडी असा एकूण ११ लाख १४ हजार रुपयांचा मुद्दे माल जप्त केल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी विपुल पाटील यांनी दिली.

याबाबत पोलीस उपविभागीय अधिकारी विपुल पाटील म्हणाले की, काल (दि. १३) दुपारी ४:३०च्या सुमारास नेवरी गावच्या हद्दीत राहुल महाडिक यांच्या शेतातील पत्र्याच्या उघड्या शेडमध्ये पत्त्यांचा क्लब सुरू असल्याची माहिती आम्हाला मिळाली. ही माहिती समजताच कडेगाव पोलीस पथकांसह तिथे छापामारी केली.

यावेळी मायाक्का नगर येथील अक्षय सुनील धुमाळ (वय २२), प्रशांत संजय घोरपडे (वय २६), नेहरूनगर भागातील अमित महेश भिंगारदेवे (वय २४), खानापूर तालुक्यातील गार्डी येथील साईराज नंदकुमार बोडरे (वय ३४), बिरजू दिनेश पंडित (वय २९) हे कडेगाव येथील नाथा सुदाम गुरव (वय ४०) हे सहाजण महेश अर्जुन लिमकर (वय ३५) यांच्या सांगण्यावरून तीन पानी पत्त्याच्या पानावर पैसे लावून जुगार खेळ खेळत होते. पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले आहे.

यावेळी अक्षय धुमाळकडे आठ हजार रुपये रोख रक्कम व हातातील तीन पत्त्याची पाने, प्रशांत घोरपडे, साईराज बोडरे, अमित भिंगारदेवे, बिरजू पंडित, नाथा गुरव यांच्याकडे एकूण ५४ हजार रुपये रोख रक्कम तसेच ४० हजार रुपये किंमतीच्या एकूण पाच दुचाकी गाड्या (नंबर एम.एच.१० बी.टी.२१६३, एम. एच.१० ए.बी.६२३७, एम. एच.१० डी. एच.१०, ३५६ ०, के. ए.२५. ३६७९, एम. एच.१० बी.पी. ५८ २७ आणि ७० हजार रुपये किमतीची एक दुचाकी नंबर एम.एच.१० सी.सी.६४३२ आणि ८ लाख रुपये किंमतीची नंबर एम.एच.११ सी.जी.९९६९ चारचाकी असे मिळून ११ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच अक्षय धुमाळ, प्रशांत घोरपडे, अमित भिंगारदेवे, साईराज बोडरे, बिरजू पंडित, नाथा गुरव आणि महेश लिमकर या सात जणांच्या विरोधात महाराष्ट्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विट्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे प्रतिनियुक्तीवर असलेले पोलीस श्रीकांत दत्तात्रय कुंभार यांनी फिर्याद दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news