Bageshwar Baba controversial statement
नागपूर: छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यातील गुरू -शिष्य नाते सांगताना बागेश्वरधामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपुरात दिलेले संदर्भ त्यांना अडचणीत आणणारे ठरले आहेत. तसेच प्रत्येकाने चार मुले जन्माला घाला, एक राष्ट्रसेवेसाठी संघाला द्या, असेही विधान त्यांनी केले.
शुक्रवारी (दि.२४) भारत दुर्गा मंदिर कोनशिला निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शेवटी महाराजांनी त्यांना मुकुट परत देत मी सांगतो, तसा राज्यकारभार करा, असा आदेश दिला. असे गुरू शिष्याचे नाते होते, असेही विधान त्यांनी यावेळी केले.
सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अनेक संत उपस्थित असताना त्यांचे हे विधान अनेकांना पचनी पडलेले नाही. आपण युद्ध करून थकलो आता तुम्हीच राज्यकारभार सांभाळा, असे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपला मुकुट रामदास स्वामी यांच्यापुढे ठेवत म्हटल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आज त्यांच्या या वक्तव्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला म्हणून टीका झाली. यासोबतच देशावरील कुठल्याही संकटात पुढे असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक करताना प्रत्येकाने चार मुले जन्माला घाला, एक राष्ट्रसेवेसाठी संघाला द्या, असेही विधान त्यांनी केले.
तर दुसरीकडे गोविंददेव गिरी महाराज यांनी नाशिकमधील कार्पोरेट जेहाद, वाढत्या शोषणावर आपल्याला संताप येत नसेल तर आपण मृतप्राय झालो आहोत का, असा संताप व्यक्त केला.अवतीभवतीच्या दानवांचे निर्दालन नव्हे मतपरिवर्तन महत्वाचे आहे. रामराज्य स्थापन होईपर्यंत राम मंदिर निर्मितीची प्रक्रिया सुरूच राहील, या त्यांच्या विधानाचीही आज चर्चा रंगली.