Devendra Fadnavis on Sharad Pawar
नागपूर : महाराष्ट्राची एक वेगळीच संस्कृती आहे. वाढदिवसाच्या अभिष्टचिंतनासाठी मी ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आभारी आहे. शेवटी आपण सगळे वैचारिक विरोधक आहोत. कुणी कुणाचा शत्रू नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केले. नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीसांची काम करण्याची गती पाहून मलाही आश्चर्य वाटते, या शरद पवार यांच्या विधानावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार साहेबांनी असे शब्द माझ्या साठी वापरणे हा त्यांचा मोठेपणा असल्याचेही ते म्हणाले.
कृषीमंत्री कोकाटे यांच्या या वक्तव्याबाबत गडचिरोली येथ माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचे असे वक्तव्य चुकीचे असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, "ते काय बोलले हे एकलं नाही, पण तसं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी अस वक्तव्य करणे चुकीच आहे. पीक विम्याच्या संदर्भात जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धत बदलली. काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांना फायदा झाला असला तरी बहुतांश वर्षामध्ये कंपन्यांना फायदा जास्त झाला. त्यामुळे आपण त्याची पद्धत बदलली. त्यांचबरोबर ५ हजार कोटी रूपये दरवर्षी शेतीमध्ये गुंतवणूक करू. २५ हजार कोटी रूपयांची शेतीमधील गुंतवणूक वाढवत आहोत, असे असताना अशा प्रकारचे वक्तव्य योग्य नाही," असे फडणवीस म्हणाले.