मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Pudhari Photo
नागपूर

Devendra Fadnavis | वाढदिवशी मुख्यमंत्री फडणवीस करणार गडचिरोलीत एलएमईएलच्या स्टील प्रकल्पाचा शिलान्यास

विदर्भातील पहिला एकात्मिक ४.५ मिलियन टन प्रतिवर्ष क्षमतेचा स्टील प्रकल्‍प :

पुढारी वृत्तसेवा

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यातील कोन्सारी येथे लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) च्या ४.५ मिलियन टन प्रतिवर्ष क्षमतेच्या स्टील प्रकल्पाचा पायाभरणी करणार आहेत. हा प्रकल्प विदर्भातील पहिला एकात्मिक स्टील प्रकल्प ठरणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस २२ जुलै २ रोजी कोन्सारी येथे या स्टील प्रकल्पाची पायाभरणी करतील. विशेष म्हणजे याच दिवशी मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे. त्याच दिवशी हेडरी येथे उभारण्यात आलेल्या ५ मिलियन टन प्रतिवर्ष क्षमतेच्या आयर्न ओर ग्राइंडिंग प्लांटचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. हा प्रकल्प एलएमईएलने केवळ एका वर्षात पूर्ण करून कार्यान्वित केला आहे.

एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन म्हणाले, "गडचिरोली जिल्ह्यातील कोन्सारी येथे विदर्भातील पहिल्या एकात्मिक स्टील प्रकल्पाची पायाभरणी होत आहे. हे एक ऐतिहासिक स्वप्न साकार होण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे."

या सोबतच १० मिलियन टन प्रतिवर्ष क्षमतेच्या स्लरी पाइपलाइन प्रकल्पाचे उद्घाटनही होणार आहे. ही पाइपलाइन महाराष्ट्रातील पहिली कार्यरत लोखंड स्लरी पाइपलाइन ठरणार आहे. हेडरी ते कोन्सारी अशी ८५ किमी लांबीची पॅलेट प्लांट दरम्यान असलेली ही पाइपलाइन कच्च्या मालाच्या वाहतुकीसाठी महत्त्वाची असून, ती कार्बन उत्सर्जनात ५५ टक्के घट करेल आणि संपूर्ण प्रकल्पाच्या दळवणळणाची कार्यक्षमताही वाढविणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT