नागपूर

Cotton Prices : कापसाचे दर आणखी कोसळतील : अनिल देशमुख

अविनाश सुतार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : कांदा उत्पादक शेतकरी कांदा दर कमी झाल्याने अडचणीत आले असताना आता सरकारने ३१ मार्चपर्यंत निर्यात बंदी उठवणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे कांद्याचे भाव पुन्हा कमी होणार आहे. कापूस उत्पादक पण त्याच स्थितीत आहेत. कापूस आयात होत असल्याने कापसाचे दर आणखी कोसळणार, अशी भीती माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली. Cotton Prices

देशमुख म्हणाले, आमचे सरकार असताना १२ हजार रुपये दर होता. आता तो ६ हजार पर्यंत खाली आलेला आहे. भाजप सरकार शेतकऱ्यांना मदत करणारे सरकार नाही. केंद्र सरकारने आयात, निर्यात धोरणावर विचार करून शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. कापसाचे आयात दर कमी तर निर्यात दर जास्त केला. तर दुसरीकडे संत्री, मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. बांगलादेशमध्ये निर्यात कमी झाल्याने संत्र्यांचे भाव घसरले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दिल्लीतील शेतकरी आंदोलन ही दुःखाची बाब आहे. शेतकऱ्यांना आंदोलनापासून रोखणे, हे अत्यंत दुःखद आहे. सरकारने शेतकरी प्रश्नावर संवेदनशील निर्णय घ्यावा, गेल्यावेळी सारखी परिस्थिती येणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी, असे आवाहन देशमुख यांनी केले. Cotton Prices

दरम्यान, पक्ष आणि चिन्ह संदर्भात छेडले असता जो पक्ष शरद पवार यांनी २५ वर्ष आधी काढला, तो पक्ष आमच्याकडून काढून घेतला. चिन्हही काढून घेतले. अर्थातच हे सर्व एका अदृश्य शक्तीच्या मदतीने घडत आहे. या विरोधात सुप्रीम कोर्टात आम्ही दाद मागितली आहे. निवडणूक आयोग, अध्यक्षांनी दबावाखाली निर्णय घेतला आहे. नक्कीच कोर्टात आम्हाला न्याय मिळेल. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्याने

Cotton Prices : आता लवकर चिन्ह द्यावे लागेल.

मराठा आरक्षण बाबतीत बोलताना, काल दिलेले मराठा आरक्षण कोर्टात टिकणार नाही, असे घटनातज्ञांचे मत आहे. केवळ आगामी निवडणुका तोंडावर असल्याने हा निर्णय सरकारने घेतला, असा आरोप देशमुख यांनी केला. आम्ही सातत्याने विधानसभेत राज्यातील ड्रॅग्ज रॅकेट व त्यावर कारवाई करण्याची मागणी केली. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे बॅक वर्ड आणि आउट वर्ड सोर्स शोधून काढावेत. महाराष्ट्र उडता पंजाब होईल का? अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT