काँग्रेसने सतरंजीपुरा येथील सुभाष पुतळ्यासमोर निषेध आंदोलन केले  (Pudhari Photo)
नागपूर

Congress Protest | भाजयुमो कार्यकर्त्यांविरोधात काँग्रेस रस्त्यावर; घोषणाबाजी करून अटकेची मागणी

सतरंजीपुरा येथील सुभाष पुतळ्यासमोर निषेध आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

Congress Protest vs BJYM Workers

नागपूर : सेंट्रल एव्हेन्यूवरील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळील आमदार अभिजित वंजारी यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या शटर आणि फलकाला काही समाजकंटकांनी रविवारी काळे फासले. हा पूर्वनियोजित हल्ल्याचा कट होता, असा आरोप करीत या घटनेच्या निषेधार्थ आज (दि.१) काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सतरंजीपुरा येथील सुभाष पुतळ्यासमोर निषेध आंदोलन केले.

या घटनेतील समाजकंटकांवर कठोर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशा घोषणा दिल्या. या आंदोलनात काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, माजी मंत्री अनिस अहमद, माजी महापौर नरेश गावंडे, माजी नगरसेवक प्रशांत धवड, नयना झाडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

नागपूर विभागाचे पदवीधर मतदार संघाचे आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. अभिजीत वंजारी यांचे पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील जनसंपर्क कार्यालयाच्या बोर्डावर भाजयुमोचे कार्यकर्त्यांनी काळा रंग फेकला. पूर्व नागपूरचे आमदार भाजपचे कृष्णा खोपडे असताना या फलकावर पूर्व नागपूर असा उल्लेख का,असा भाजयुमोचा सवाल आहे. गणेश उत्सवाच्या सणासुदीमध्ये जाणून बुजून सामाजिक सलोखा खराब करण्याच्या प्रयत्न काही मंडळी करीत आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT