Chandrapur Mayor Election  Pudhari
नागपूर

Chandrapur Mayor Election | कसा उलटला काँग्रेसचा डाव अन् चंद्रपूर महापालिकेत भाजप आघाडीचा झाला महापौर

ठाकरे शिवसेनेला सव्वा वर्षे महापौरपद

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Municipal Corporation

नागपूर : ठाकरे शिवसेनेची भूमिका काँग्रेसचा महापौर व्हावा म्हणून आम्हाला सकारात्मक दिसली. चंद्रपूरमधील ही सर्व परिस्थिती आदित्य ठाकरेंच्या कानी टाकली. शेवटी अंतिम निर्णय हा त्यांनाच घ्यायचा होता, असे काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केल्याने चंद्रपूरला भाजपचा महापौर कसा झाला? याचा बराच उलगडा झाला आहे.

स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेश दौऱ्यातून देखील यात लक्ष घातल्याने जादूची कांडी फिरली, असे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी स्पष्ट केले आहे. यानिमित्ताने सव्वा वर्षे का होईना महापौरपद शिवसेनेला मिळणार आहे. यामुळे आता मातोश्रीचा आदेश पाळला गेला नाही. शिस्तभंग कारवाई होणार या आरोपात अर्थ नाही, असे बोलले जाते.

दुसरीकडे कुठल्याही गटाला महत्व नाही. काँग्रेसचा महापौर व्हावा, ही आमची भूमिका. मोठा पक्ष आमचा. मोठे पद आम्हाला मिळावे, असा विजय वडेट्टीवार यांचा आग्रह होता. मात्र काँग्रेसला हाच दुराग्रह दोन्ही गटांना नडला आणि सत्ता हातातून गेला. भाजपच्या आघाडीचा महापौर झाला.

काँग्रेस एकट्याने लढणार...

चंद्रपूरमध्ये शिवसेना उबाठा,भाजप,शिंदे गट एकत्र आल्यानंतर राज्यात नव्या घडामोडींची चर्चा आहे. अशावेळी पुढील सर्व निवडणुका काँग्रेस एकट्याने लढण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात बोलताना वडेट्टीवार यांनी याविषयीचे सुतोवाच आमच्या प्रदेशाध्यक्षांनी केले आहे. मी ऐकलेले आहे. ते किती खरे त्याविषयी चर्चा झाली नाही. चर्चा झाली तर कळेल.

दरम्यान,महाविकास आघाडीत काँग्रेस आहे की नाही या चर्चेला आज अर्थ नाही. आता निवडणुका नाहीत. साडे तीन वर्षांनंतर हा प्रश्न बघू असे संकेत वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT