पोलिसांनी २३८ गोवंशीय प्राण्यांची सुटका केली. (Pudhari Photo)
नागपूर

Nagpur Crime News | नागपुरात २४ लाखांच्या मुद्देमालासह गोवंश तस्करांची टोळी जेरबंद

पोलिसांच्या कारवाईत २३८ गोवंशीय प्राण्यांची सुटका

पुढारी वृत्तसेवा

Illegal Cattle Transport in Nagpur

नागपूर: जुनी कामठी भागात पोलिसांनी केलेल्या कारवाईत 238 गोवंशीय प्राण्यांची सुटका करण्यात आली. सुमारे 24 लाखांच्या मुद्देमालासह तस्करांची टोळी जेरबंद करण्यात आली. जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा या कारवाईनंतर सतर्क झाली असून, गोवंश तस्करांच्या मुसक्या आवळणे सुरू केले आहे.

बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या होऊ नये, यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले होते. पोलिसांनी जुनी कामठी परिसरातील एका गोडाऊनमध्ये छापा टाकला. यावेळी 238 गोवंश त्याठिकाणी मरणासन्न अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी गोडाऊन मालक आणि घरमालक नब्बु वजीर कुरेशी, साजिद कुतुब कुरेशी, जुबेर अल्ताब कुरेशी, फैय्याज सत्तार कुरेशी, आसिफ कुरेशी आणि त्यांना मदत करणाऱ्या इतर व्यक्तींवर गोवंशीय प्राण्यांची अवैध कत्तली करण्याचा आरोपाखाली गुन्हा नोंदवून ताब्यात घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT