BJYM protest Nagpur University Pudhari
नागपूर

​BJYM Protest Nagpur | 'भाजयुमो'ची नागपूर विद्यापीठावर धडक; ढिसाळ कारभाराचा निषेध, प्रशासनाविरोधात घोषणाबाजी

नागपूर विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय गोंधळ दूर करून विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ मार्गी लावा

पुढारी वृत्तसेवा

Nagpur University mismanagement

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय गोंधळ दूर करून विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ मार्गी लावण्याच्या मागणीसाठी 'भारतीय जनता युवा मोर्चा'तर्फे विद्यापीठावर एक धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या मार्गदर्शनात, युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन करारे यांच्या नेतृत्वात व भाजप महामंत्री श्रीकांत आगलावे, रितेश गावंडे व सिनेट सदस्य विष्णू चांगदे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी 'भारत माता की जय' च्या घोषणांनी संपूर्ण विद्यापीठ परिसर दणाणून गेला होता. आंदोलनकर्त्यांनी विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विद्यापीठाने पोलिसांनी पाचारण केले. पोलिस आंदोलकांना पकडून अंबाझरी पोलीस स्थानकमध्ये घेऊन गेले त्यानंतर युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने कुलगुरूची भेट घेऊन त्यांना २० मुद्दे असलेल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. ४८ तासांच्या आत विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या सोडवाव्यात, अशी मागणी केली. ​

यावेळी युवा मोर्चाचे महामंत्री रितेश पांडे,रिषभ अरखेल,अथर्व त्रिवेदी संपर्क महामंत्री नागेश साठवणे, युवती प्रमुख प्रशंसा भोयर, विद्यार्थी आघाडी संयोजक शंतनू झाडे, शशांक समुंद्रे, मंडळ अध्यक्ष समर्थ रागीट, विक्की पाण्डे, हर्षल वाडेकर, अक्षय शर्मा, उदय मिश्रा, गोविंदा काटेकर, पिंकेश पटले, सनी झेंडे प्रज्वल मंगर, सह युवती प्रमुख योगिता बुरडे, प्रतीक्षा घारडे, कल्याणी कुबडे, तुषार ठाकरे, आयुष तपकर, साहिल डोरलिकर, भूपेंद्र मिश्रा, आयुष शर्मा, हर्ष रामटेके, निलेश हेडाऊ, यश गायकवाड, विवेक काळे, विशाल कुकरेजा, मनीष वर्मा, कुणाल पंडित, वेदांत जोशी, श्रदधा ढवळे, निलय आठल्ये, सौरभ साह, अनुज समुंद्रे, अतुल कनोजिया, प्रज्वल कङू, साहिल ठाकूर,

नेहाल दूरबुडे, विवेक चांदेकर भावेश मठघरे, साहिल गौर, गौरव शाहू, नविन धकीते, अक्षय धरमविजवार, ऋषिकेश बढिये, अनिष वैद्य,गौतम वर्मा, श्री राऊत, विद्यार्थी आघाडी चे आशू गुमगावकर, यश गौर, लिखित गणवीर,प्रयाग पांडे,संकेत जावळकर, अर्णव दीपसिंग, आर्यन टाकभौरे युवती आघाड़ीची रश्मी श्रीवास, वैभवी धामनकर, श्रद्धा धवळे, किरण गुजरकर, मिनल गेहलोत, राधिका निमगावकर आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT