नागपूर - भारतीय सैन्याच्या शौर्याने जगभरात गाजलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये, ज्या प्रकारे सैन्याने स्वतःच्या घरात घुसून शत्रूचे अड्डे मोडून काढले. पाकिस्तानचे नापाक हल्ले आकाशातच उद्ध्वस्त झाले. या युद्धात, भारताचे काही सैनिकही शहीद झाले देश या शहीदांचा कायमचा ऋणी आहे.
भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी भाजपातर्फे उद्या रविवारी 18 मे रोजी सिन्दुर सन्मान, तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. देशभक्त नागरिकांनी सकाळी ८ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इतवारी शहीद चौकातील शहीद स्मारकापासून पंडित बच्चराज व्यास चौकापर्यंत ही तिरंगा यात्रा असून नेतृत्व माजी सैनिक आणि वीरमाता करतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, मोहन मते, प्रवीण दटके, संदीप जोशी, माजी महापौर दयाशंकर तिवारी आणि अनेक सामाजिक आणि व्यावसायिक संघटनांचे अधिकारी आणि शहरातील देशभक्त नागरिक या रॅलीत उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी दिली.