महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे  (File photo)
नागपूर

Chandrashekhar Bawankule | इतरांचे माहित नाही, ५१ टक्के मते घेण्याची भाजपची तयारी : चंद्रशेखर बावनकुळे

Maharashtra BJP | काँग्रेस, शरद पवार गट किंवा ठाकरे गटाला एकही जागा मिळणार नाही

पुढारी वृत्तसेवा

Chandrashekhar Bawankule on Local Body Elections

नागपूर: भाजप महायुतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 51 टक्के मतदानाची तयारी केली आहे. विधानसभेत देखील आम्हाला 51.78 टक्के मते मिळाली. राज ठाकरे आणि त्यांच्या मित्र पक्षांनी काय तयारी केली आहे, हे मला माहीत नाही. मात्र आमची तयारी पूर्ण झाली आहे. कोणीही आले आणि लढले तरीही 51 टक्के मते महायुतीलाच मिळणार. काँग्रेस, शरद पवार गट किंवा ठाकरे गटाला एकही जागा मिळणार नाही, असा दावा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केला.

जनतेने ठरवले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला समृद्ध करत आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा विकास करत आहेत. त्यामुळे जनता विकासाच्या बाजूनेच जाणार आहे. ज्यांची निवडणूक लढविण्याची तयारी नाही, ते लोक अशा प्रकारची विधाने करतात. आम्ही उद्या निवडणुका लागल्या तरीही पूर्णपणे तयार आहोत. एक कोटी 51 लाख सदस्य असलेला भाजप, तसेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे देखील तयार आहेत. ते काय करणार हे मला माहीत नाही, मात्र आमची तयारी पक्की आहे.

मराठी ही आमच्या रक्तातील भाषा आहे. मराठी भाषा महाराष्ट्राला देशातील सर्वोत्तम राज्य करणारी भाषा आहे. मराठी भाषेसाठी आम्ही सर्वजण एकाच विचाराचे आहोत. मात्र, हिंदी भाषा बोलणाऱ्या व्यक्तीवर आपण कोणत्याही प्रकारची बोलीभाषेवरील बंदी आणू शकत नाही. मराठीसोबत हिंदी बोलणाऱ्यांना मारहाण करणे, हे राज्याला शोभणारे नाही. मराठी आपली भाषा आहे, पण त्याचसोबत हिंदीचाही सन्मान केला पाहिजे. राज ठाकरे यांची ही भूमिका योग्य आहे.

आज महसुली सप्ताहाचा चौथा दिवस आहे. प्रत्येक मंडळात छत्रपती शिवाजी महाराज अभियान सुरू झाले आहे. शैक्षणिक कामासाठी विविध दाखल्याची गरज भासते, त्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले याकडे लक्ष वेधले.

भोंडेकर – परिणय फुके वादावर नाराजी

कोणीही वादग्रस्त वक्तव्य करू नये. “बाप काढला” किंवा अशा प्रकारचे शब्द वापरू नयेत. राज्यात आम्ही सर्व भावाप्रमाणे काम करत आहोत. भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. मला संपूर्ण विषय माहीत नाही, पण “बाप” असे शब्द वापरले असतील, तर ते योग्य नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT