भाजप आमदार सुमित वानखेडे (Pudhari Photo)
नागपूर

Sumit Wankhede | गांधीवादी संस्थांमध्ये माओवादी विचारसरणीच्या लोकांचा शिरकाव : सुमित वानखेडेंचा आरोप

जनसुरक्षा विधेयकावरून विरोधकांनी महायुती सरकारला लक्ष्य केले असताना भाजप आमदाराने पलटवार केला आहे

पुढारी वृत्तसेवा

Maoist links in organizations

नागपूर: नुकत्याच विधिमंडळात पारित झालेल्या जनसुरक्षा विधेयकावरून विरोधकांनी महायुती सरकारला लक्ष्य केले असताना भाजपने थेट पलटवार केला आहे. वर्धा जिल्ह्यातील गांधीवादी संस्थांमध्ये आणि महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात माओवादी विचारसरणीच्या लोकांचा शिरकाव झाला आहे, असा आरोप भाजप आमदार सुमित वानखेडे यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले की, महात्मा गांधींच्या विचारसरणीवर चालणाऱ्या या संस्थांमधून माओवादी विचार पसरवले जात जात आहेत. अशा कारवायांना आळा घालण्यासाठीच महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा राज्यात लागू करण्यात येत असून तो फायदेशीर ठरणार आहे.

महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीनंतर अशा माओवादी विचारसरणीच्या संस्थांवर कारवाई करणे शक्य होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस पक्षाने शहरी नक्षलवाद पसरवणाऱ्या माओवादी विचारांच्या लोकांची मदत घेतल्याचा आरोपही वानखेडे यांनी यावेळी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT