आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजप मिशन मोडवर कामाला लागली आहे. File Photo
नागपूर

भाजपचा विदर्भावर फोकस; ३२ मतदारसंघाचा बुधवारी घेणार आढावा

पुढारी वृत्तसेवा
राजेंद्र उट्टलवार

नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजप मिशन मोडवर कामाला लागली आहे. महायुतीतील तिकीट वाटप, मित्रपक्ष समन्वयाच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वाधिकार राहणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बुधवारी (दि.१४) नागपुरात महायुतीची पूर्व विदर्भातील ही महत्त्वाची बैठक वर्धा रोडवरील एअरपोर्ट साऊथ येथील सभागृहात होत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार ऑनलाईन संबोधित करणार आहेत. (Maharashtra BJP)

देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबाबदारी

मविआत काँग्रेस विदर्भात सर्वाधिक जागा लढणार असल्याने भाजप-काँग्रेस अशाच परंपरागत लढती होणार आहेत. शिवसेनेच्या मतांमध्ये उबाठा शिवसेनेपाठोपाठ आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील विभागणी करण्याची शक्यता लक्षात घेता यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी जुळवून घेतल्याशिवाय सत्तेचा मार्ग सोपा नाही, हे भाजप आणि संघ पदाधिकारी यांना पटवून देण्यात फडणवीस यशस्वी ठरल्यानेच आता त्यांच्यावर अधिक जबाबदारी देत पक्ष नेतृत्वाने विश्वास टाकला आहे. (Maharashtra BJP)

विद्यमान आमदारांविरोधात असंतोष असेल, तर तिकीट नाही

विदर्भातील 62 जागांपैकी 40 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत आघाडी घेतली असल्याने महायुतीला विदर्भावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागत आहे.' मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या निमित्ताने भाजपने गावागावात पोस्टर्स लावलेले आहेत. इच्छुकांनी या माध्यमातून आपले शक्ती प्रदर्शन सुरू केले आहे. सीटिंग गेटिंगचा फार्मुला बहुतांशी मतदारसंघात कायम राहणार असला तरी विधानसभा निवडणुकीतही ज्या मतदारसंघात विद्यमान आमदारांविरोधात असंतोष असेल, सर्वेक्षणाचे अहवाल विरोधात असेल. तर त्याला कुठल्याही परिस्थितीत तिकीट द्यायचे नाही, ही भूमिका भाजप नेतृत्वाने स्पष्ट केली आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुकांची चाचपणी करतानाच महायुतीत बंडाळी न होता पुढे जाण्याचे 200 पार जागा जिंकण्याचे आव्हान महायुतीला पार करावे लागणार आहे. (Maharashtra BJP)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT