नागपूर विद्यापीठतील मुद्यांमुळे भाजपातच दोन गट

आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची माजी महापौर डॉ. कल्पना पांडे यांची मागणी
Nagpur University Issue
नागपूर विद्यापीठPudhari File Photo
Published on
Updated on

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे 2024 हे शताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. मात्र, विद्यापीठातील विविध प्राधिकरणांवर भाजप आणि संघ परिवाराचे अधिराज्य असताना काही दिवसांपासून कुलगुरू चौधरी यांच्या निमित्ताने भाजप- संघ परिवारातीलच दोन्ही गट आमने-सामने आल्याचे चित्र आहे. बैठकीत एक आणि बाहेर दुसरी भूमिका घेत विद्यापीठाची बदनामी केल्याप्रकरणी विष्णु चांगदे, आ. प्रवीण दटके आणि भाजप युवा मोर्चो प्रदेश सरचिटणीस शिवाणी दाणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमवारी (दि.12) माजी महापौर डॉ कल्पना पांडे यांनी पत्रपरिषदेतून केली. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. आम्ही कुठल्याही पक्षाचे म्हणून नव्हे तर नागपूरकर म्हणून सर्वपक्षीय, विविध संघटना पदाधिकारी विद्यापीठ बचाव आंदोलन अंतर्गत एकत्रित आल्याचे यावेळी आवर्जून सांगण्यात आले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे एमकेसीएलला काम देताना कुठलाही आर्थिक गैरव्यवहार झाला नाही. ज्या सदस्यांनी व्यवस्थापन परिषदेत एमकेसीएलला कामे देण्यात यावे अशी मंजुरी दिली, सह्या केल्या तेच बाहेर येऊन वारंवार खोटे बोलून विद्यापीठाची प्रतिमा मलिन करीत आहेत याकडे लक्ष वेधले आहे. यावेळी अधिक बोलताना कल्पना पांडे म्हणाल्या की, 19 जून 2006 च्या शासन निर्णयानुसार प्रति विद्यार्थी ५० रुपये वार्षिक शुल्क असे विद्यापीठ आणि एमकेसीएल मध्ये करार होऊन 2007 पासून विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी एमकेसीएल ई-सुविधा देणार असा निर्णय झाला. परंतु, एमकेसीएलने ने 2011 ला हे काम बंद केले. 2007 ते 2011 पर्यंत त्यांना एकही पैसा देण्यात आला नव्हता.

Nagpur University Issue
Nashik News | घोरवड शिवारात होणार मुक्त विद्यापीठ विस्तारित केंद्र

२०१५ मध्ये डॉ. काणे जेव्हा कुलगुरू होते तेव्हा त्यांनी व्यवस्थापन परिषदेची मान्यता न घेता एमकेसीएल या कंपनीला जुन्या करारांतर्गत कामे दिले. एमकेसीएल आणि विद्यापीठाच्या करारनाम्यात कुठलाही पक्ष एकतर्फी निर्णय घेवून काम थांबवू शकत नाही, असे ठळकपणे नमूद असल्याने त्यांचा करार संपुष्टात आलेला नाही. मात्र चौधरी यांच्या कार्यकाळात एमकेसीएलला परत कामे देण्यात आली. ती कामे चुकीच्या पद्धतीने दिल्याची काही लोकांनी आरडाओरड केली. राज्यातील सर्वच विद्यापीठ एमकेसीएलचे भागधारक आहेत. त्यामध्ये नागपूर विद्यापीठाचासुद्धा समावेश आहे.

एमकेसीएलला दिलेल्या कामाचा निर्णय हा फक्त एकट्या कुलगुरुंचा वैयक्तिक नव्हता. तर व्यवस्थापन परिषदेचा निर्णय होता. तरी विद्यापीठावर आरोप होऊ लागल्याने सर्वात पहिली डॉ. आत्राम यांची चौकशी समिती तयार करण्यात आली. मात्र या समितीचा अहवाल दडपून ठेवल्या गेला. पुढे आणखी काही समित्या तयार करण्यात आल्या. फुलझेले यांच्या चौकशी समितीत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य विष्णू चांगदे होते. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत कोणत्याही सदस्यांनी आक्षेप घेतला नाही. मात्र काही सदस्यांनी बाहेर येऊन माध्यमासमोर खोटे आरोप केल्याने त्यांच्या हेतूवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Nagpur University Issue
नागपूरमधील मशिदींवर नियमानुसार भोंगा वाजला !

एमकेसीएलला कामे देण्यात यावे याविषयी व्यवस्थापन परिषदेतील सर्व सदस्यांच्या सह्या आहेत. व्यवस्थापन बैठकीत सहमती आणि बाहेर ते खोटे बोलतात. आम्ही डॉ. चौधरी किंवा एमकेसीएलची बाजू मांडत नसून विद्यापीठाची प्रतिमा काही वर्षात मलीन करण्याचा प्रकार करण्यात आला. एमकेसीएलविषयी विष्णू चांगदे आणि आ. प्रवीण दटके यांनी गदारोळ केला. चांगदे, दटके या सर्वांसह तर शिवाणी दाणी यांनाही डॉ. चौधरी निर्दोष आहेत, हे माहिती असूनही खोट्या बोंबा वांरवार ठोकून विद्यापीठाची बदनामी केली जात आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, असेही पांडे यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी पत्रपरिषदेत विजया धोटे, प्रवीण राऊत, कल्पना मानकर, कृष्णा चौंगुले, नयना झाडे आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news