fraud case (File Photo)
नागपूर

Nagpur Crime | कुणाला पेट्रोल पंप, गॅस एजन्सी तर कुणाला नोकरी: केंद्रीय मंत्रालयाच्या नावे 2 कोटींचा गंडा!

Beltarodi Police Station | बेलतरोडी पोलिसांनी चार ठकबाजांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Fraud Case

नागपूर : केंद्र सरकारच्या विविध विभागात नोकरी लावून देतो. पेट्रोल पंप, गॅस एजन्सी मिळवून देतो, असे आमिष दाखवून २ कोटी रुपयांनी गंडा घातल्याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी चार ठकबाजांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

रामचंद्र मेहपत पाटील (वय ३६, रा. मुलताई, जि. बैतुल), देवेंद्र भार्गव (वय ५५, रा. ग्वाल्हेर), शिवम संतोषकुमार सेन (वय ३५, रा. सागर) व योगेश मिश्रा (वय ६१, रा. लखनौ) अशी या आरोपींची नावे आहेत. नामदेव विश्वनाथ कडू (वय ६४, रा. उज्ज्वल सोसायटी, नरेंद्रनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

'मी केंद्रीय मंत्रालयातील पीएचा साहाय्यक असल्याची बतावणी पाटील यांनी नामदेव कडू यांना दिली.त्यानंतर त्याने भार्गव हा केंद्रीय मंत्रालयांत पीए असल्याचे सांगितले. रेल्वे, प्राप्तिकर, पुरातत्व विभाग, नीती आयोग, एफसीआय आदींमध्ये नोकरी लावून देतो असे अनेकाना सांगितले. इतरांनी गॅस एजन्सी, वेअर हाउस इतकेच नव्हे तर पेट्रोलपंप मिळवून देतो, असे पाटील याने कडू यांना सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.

कडू यांनी वेगवेगळ्या कारणासाठी ७५ लाख रुपये यासोबतच त्यांच्या नातेवाइकांनीही १ कोटी ९४ लाख हजार ६०० रुपये दिले. अखेर आपली सर्वांची फसवणूक झाली हे लक्षात येताच त्यांनी बेलतरोडी पोलिस स्टेशन गाठत तक्रार दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT