नागपूर

Jyotiraditya Scindia : नागपुरात एव्हीएशन, कार्गो हबची क्षमता : ज्योतिरादित्य सिंधिया

अविनाश सुतार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : मिहानमध्ये एव्हीएशन, कार्गो हबची मोठी क्षमता असून सुसज्ज एमआरओ विकसित झाल्याने देशविदेशातील अनेक कंपन्यांची विमाने दुरुस्तीसाठी नागपुरात येणार आहेत. त्यामुळे युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी उड्डान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले.Jyotiraditya Scindia

मिहान -सेझ येथील एएआर- इंदामर टेक्निक्स एमआरओ सुविधेचे उद्घाटन आज (दि.१२) त्यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. Jyotiraditya Scindia

यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, इंडामेर एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रजय प्रफुल्ल पटेल, माजी खासदार विजय दर्डा, एअरबस इंडियाचे अध्यक्ष रेमी मिलार्ड, इंडिगोचे सह-संस्थापक आणि एमडी राहुल भाटिया, इंडिगोचे सीईओ पिटर एलबर्स, येस बँकेचे सीईओ प्रशांत कुमार आदी उपस्थित होते.

सिंधिया पुढे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात हेलिपॅड, हेलिकॉप्टर सेवेचा विस्तार, देशातील सर्वसामान्य नागरिकांना विमानातून प्रवास करता यावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाचे व्हिजन ठेवून 'न भूतो न भविष्यती' असे काम करुन दाखविले आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने 10 वर्षात अयोध्येसह देशातील 74 विमानतळाचा विकास केला आहे. नवी मुंबई विमानतळ नोव्हेंबर डिसेंबरला सुरू होईल. डोमेस्टिक व आंतरराष्ट्रीय हवाई प्रवाशांची संख्या सतत वाढत असून कधीकाळी विमान कंपन्या डबघाईस आल्या असताना आता 4 नव्या विमान कंपन्यांची भर पडली आहे. देशात 10 शहरात दोन विमानतळ विकसित केली जात आहेत.

Jyotiraditya Scindia एमआरओमुळे इतर उद्योग व्यवसायाला चालना- नितीन गडकरी

देशाचे झिरोमाईल असलेल्या नागपूर शहरातील मिहान -सेझमध्ये औद्योगिक विकास झपाटयाने होत आहे. नव्या एमआरओमुळे इतर उद्योग व्यवसायाला चालना मिळणार आहे. तिसरी महासत्ता होण्याच्या दिशेने भारत मार्गक्रमण करीत आहे. मिहान मध्ये नव्या कंपन्या येत असल्याने युवकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.एमआरओ कंपनीमुळे विमान दुरुस्तीचे काम पुन्हा वाढणार आहे. नागपूर ते सिंगापूर विमानसेवा सुरू व्हावी, अशी मागणीही गडकरींनी केली. वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने आता डबल डेकर स्कॉय बस सुरु करण्यासाठी नियोजन केल्या जात असल्याचे गडकरी म्हणाले.

एएआर इंदामर या कंपनीमुळे नागपूरसोबतच विदर्भातील युवकांना रोजगार मिळतील. विदर्भाचे आमच्यावर उपकार असल्याने मिहानमध्ये ही कंपनी सुरु करण्याचे आमचे स्वप्न होते. सर्वात जुनी एमआरओ कंपनी आणि सर्वात मोठी एमआरओ कंपनी असा सुयोग यानिमित्ताने जुळून आल्यावर खा. प्रफुल पटेल यांनी भर दिला. इंडिगोसह इतर विमाने या एमआरओत येणार असून यानिमित्ताने 100 विमानांचे सी चेक झाल्याचे आवर्जून सांगितले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT