नागपुरातील १० वर्षांतील रस्त्यांचे ऑडिट करण्याची मागणी काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी केली आहे. Pudhari News Network
नागपूर

नागपुरातील १० वर्षांतील रस्त्यांचे ऑडिट करा: विकास ठाकरे

Vikas Thakre | दुरुस्ती केलेले रस्ते काही महिन्यांतच खराब

पुढारी वृत्तसेवा

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: डांबरीकरण, काँक्रीटीकरण आणि खोदकाम केल्यानंतर दुरुस्ती केलेले रस्ते काही महिन्यांतच खराब होताना दिसतात. सार्वजनिक पैशांचा मोठा अपव्यय होत आहे आणि नागरिकांची गैरसोय होत आहे. म्हणूनच, नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, सार्वजनिक बांधकाम, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महामेट्रो यांनी गेल्या दशकात काँक्रीटीकरण, डांबरीकरण आणि दुरुस्ती केलेल्या सर्व रस्त्यांचे ऑडिट करावे, अशी मागणी नागपूर जिल्हा (शहर) काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे. (Vikas Thakre)

डीपीसीच्या बैठकीत शुक्रवारी रखडलेले, सदोष सिमेंट रस्ते व पाणी तुंबल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे केल्या. आज ठाकरे यांनी रस्त्यांवरून घेरले. (Vikas Thakre)

पश्चिम नागपूर विधानसभेत शंकर नगर चौक ते रामनगर चौक हा रस्ता ताजे उदाहरण आहे. नागपूर महानगरपालिकेने या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी, पादचारी मार्गाचे पुनर्निर्माण इत्यादींसाठी सुमारे २ कोटी रुपयांचे कामाचे कार्यदेश एका ठेकेदाराला दिले होते. हा रस्ता मार्चमध्ये डांबरीकरण करण्यात आला आणि उर्वरित कामे सुरू आहेत. पाच महिन्यांत रस्त्यावर खड्डे पडले आहेत आणि रस्ता खडीने भरलेला आहे. डांबरीकरण केलेल्या रस्त्यांची जबाबदारी (defect liability period) सुमारे तीन वर्षांची असते. रस्ता डीएलपीच्या 3 वर्षांहून अधिक काळ टिकून राहायचा होता याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले. (Vikas Thakre)

“सिमेंट काँक्रीट रस्त्यांचीही तीच अवस्था आहे. DLP कालावधी पाच वर्षांहून अधिक असूनही काँक्रीटीकरणानंतर काही महिन्यांतच भेगा, खड्डे, तडकलेली पृष्ठभागाची थर, पेव्हर ब्लॉकचे बसणे वगैरे सामान्य दृश्य आहे,” असेही ठाकरे म्हणाले.

अभियंते आणि कंत्राटदारांमधील साटेलोटे

खोदकाम केल्यानंतर दुरुस्ती केलेल्या रस्त्यांची स्थिती खूपच खराब आहे आणि त्यामुळे अपघात होत आहेत. हे सर्व अभियंते आणि कंत्राटदारांमधील साटेलोटे आहे. गेल्या १० वर्षांत या सरकारी यंत्रणांनी एकही कंत्राटदार काळ्या यादीत टाकलेला नाही. नागपूरातील रस्त्यांची स्थिती या पावसाळ्यात खूपच खराब आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी नागपूरमध्ये गेल्या १० वर्षांत केलेल्या सर्व रस्त्यांच्या कामांचे, DLP कालावधीतील रस्त्यांची स्थिती, संबंधित सरकारी यंत्रणेने केलेली कारवाई, संबंधित सरकारी यंत्रणेने केलेली दुरुस्ती आणि इतर बाबींसह ऑडिट करावे. यामुळे निश्चितच मोठा घोटाळा उघड होईल असे ठाकरे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT