गृहमंत्री अमित शहा, चंद्रशेखर बावनकुळे Pudhari
नागपूर

Nagpur Hanuman Murti | नागपुरातील देशातील सर्वात उंच हनुमान मूर्तीचे अमित शहांच्या हस्ते लोकार्पण

श्रद्धा, शक्ती, भक्ती आणि भारतीय सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक असलेला हा दिव्य प्रकल्प सध्या अंतिम टप्प्यात

पुढारी वृत्तसेवा

Tallest Hanuman Statue Koradi

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील श्री जगदंबा महालक्ष्मी मंदिर परिसरात देशातील सर्वात उंच अशा १५८ फूट उंच श्री हनुमान मूर्तीचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. श्रद्धा, शक्ती, भक्ती आणि भारतीय सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक असलेला हा दिव्य प्रकल्प सध्या अंतिम टप्प्यात आहे.

या ऐतिहासिक व आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण सोहळ्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना औपचारिक निमंत्रण दिले. अमित शाह यांनी अत्यंत आत्मीयतेने हे निमंत्रण स्वीकारले असून, जून महिन्यात लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी येण्याची तयारी दर्शवली आहे.

कोराडी येथे उभारली जात असलेली ही भव्य हनुमान मूर्ती केवळ धार्मिकच नव्हे, तर वास्तुकलेचा अद्भुत नमुना ठरणार आहे. या मूर्तीमुळे कोराडी परिसराचे धार्मिक तसेच पर्यटनदृष्ट्या महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढणार असून, देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येथे दाखल होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT