Air India Flights Pudhari
नागपूर

Nagpur Air India Flights | नागपुरातून दिल्ली, मुंबई जाणारी स्थगित विमाने पुन्हा सुरू होणार

एअर इंडिया एक्स्प्रेसची विमानसेवा येत्या १ ऑगस्टपासून पुन्हा एकदा नागपुरातून सुरू होणार

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Air India Delhi Mumbai Flights

नागपूर : मध्यंतरी विमान इंधनाच्या वाढत्या किमती आणि खर्चामुळे स्थगित करण्यात आलेली एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसची विमानसेवा येत्या १ ऑगस्टपासून पुन्हा एकदा नागपुरातून सुरू होणार आहे.

नागपूरहून दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू या महत्त्वाच्या शहरांसाठी ही उड्डाणे आहेत. १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या विमानसेवांमध्ये एअर इंडियाच्या नागपूर ते मुंबई फ्लाइट क्रमांक एआय-२५८४ आणि मुंबई ते नागपूर फ्लाइट क्रमांक एआय-२५८३, दिल्ली मार्गावरील नागपूर ते दिल्ली फ्लाइट क्रमांक एआय-४१६, दिल्ली ते नागपूर फ्लाइट क्रमांक एआय-४१५ यांचा समावेश आहे.

दरम्यान ,एअर इंडिया एक्सप्रेसतर्फे नागपूर-बेंगळुरू आणि बेंगळुरू-नागपूर दरम्यान विशेष उड्डाणे सुरू केली जात आहेत. १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या सर्व विमान फेऱ्यांचे अधिकृत बुकिंग एअरलाइन्सतर्फे सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT