मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलन Pudhari Photo
नागपूर

नागपूर : महिलेचा अपघाती मृत्यू; मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलन

शहर राष्ट्रवादी अध्यक्षांसह 13 जणांना अटक

पुढारी वृत्तसेवा

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : पूर्व नागपुरातील बुधवारी (दि.31) रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. या मृत्यूप्रकरणी गुरुवारी (दि.1) मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्यासह 13 लोकांना नंदनवन पोलिसांनी अटक केली आहे. रात्री उशिरा यातील पाच महिलांना नोटीस देत सोडून देण्यात आले. तरी आठ जण पोलिसांच्या ताब्यात असल्याने राजकारण राजकीय वातावरण तापले आहे.

राज्य सरकारच्या निषेधार्थ यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. डॉली राजेश बोरकर असे मृतक महिलेचे नाव असून गुरुवारी (दि.1) दुपारी मृतकांच्या नातेवाईकांनी रस्त्यावर सुरू केलेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्यासह काँग्रेस, भाजप व इतरही राजकीय पक्षाचे लोक मैदानात उतरल्याने सायंकाळ नंतर या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्लॉट न 16, पवनशक्ती नगर,भिलगाव रोड वाटवाठोडा येथील राजेश बोरकर(42) व डॉली राजेश बोरकर(35) आपल्या 2 वर्षीय हर्ष नामक मुलासह दुचाकीवर (एमएच 49/ बीडब्ल्यू 1749) भीम चौक ते वाठोडा दरम्यान जात असताना एका आयशर मालवाहू वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली व पळून गेला.

श्रीकृष्णनगर येथील आनंदम हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी डॉलीला मृत घोषित केले. आज हे प्रकरण चिघळले लकडगंज कळमना आणि नंदनवन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अखेर या ठिकाणी हळूहळू गर्दी वाढत असल्याने नातेवाईकांची समजूत घालून मृतदेह ॲम्बुलन्सच्या माध्यमातून अंत्यसंस्कारासाठी रवाना करण्यात आला यानंतर पोलिसांनी दुनेश्वर पेठे यांच्यासह पाच महिला व आठ पुरुषांना ताब्यात घेतल्याने नंदनवन पोलीस स्टेशन समोर रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT