विष प्राशन केलेल्या युवकाचामृत्यू Pudhari File Photo
नागपूर

नागपूर : मित्राने घेतलेली 12 लाख उधार परत न केल्याने तरुणाने संपवले जीवन

सुसाईड नोटमध्ये मित्राचे नाव लिहून उचलले टोकाचे पाऊल

पुढारी वृत्तसेवा

मित्राला बिझनेस सुरु करण्यासाठी दिलेले 12 लाख रुपये परत न केल्यामुळे तरुणाने जीवन संपवल्याची घटना नागपुरात घडली. तुषार सुधीर येवले असे या मृत तरुणाचे नाव आहे. तुषारच्या मृत्यू नंतर लिहून ठेवलेली सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली आहे. या चिठ्ठीतही गौरव चव्हाण या मित्राने घेतलेले पैसे परत न दिल्यामुळे आपण हे पाऊल उचलल्याचे लिहले आहे.

आपल्या कुटुंबाला तातडीने पैसे द्यावेत अशी विनंती केली आहे. तुषारने मित्राला हे पैसे दिले मात्र कॅफे बंद करून तो मुंबईत निघून गेला. इकडे आपले पैसे कधी मिळणार, या आशेने तो तगादा लावत होता. इकडे घरचे लोकही आपल्याला विचारणा करीत असल्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे या पत्रात नमूद आहे. विष घेतल्याने त्याची प्रकृती बिघडली नंतर कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT