विदर्भ

नागपूर : आणखी दोन ग्रामपंचायती होणार नगरपंचायती

मोहन कारंडे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील बहादुरा खरबी आणि गोन्हीसीम या दोन ग्रामपंचायतींच्या नगरपंचायती होणार आहेत. नगरविकास विभागाने मंगळवारी (दि.१४) याबाबतची अधिसूचना काढली. अलीकडेच बेसा ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत झाले आहे. गोधनी आणि कान्द्री ग्रामपंचायत देखील नगरपंचायती होण्याच्या मार्गावर आहेत.

जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचे रुपांतर नगरपंचायतीत झाले आहे. शहराच्या आसपासच्या ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे. गावांतील वाढत्या लोकसंख्येमुळे ग्रामपंचायतींचे रुपांतर नगरपंचायतीत होत आहे. मंगळवारी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने काढलेल्या अंतिम अधिसुचनेनुसार आता बहादुरा खरबी आणि गोन्हीसीम या दोन्ही ग्रामपंचायतींचे रुपांतर नगरपंचायतीत करण्यात येणार आहे. भाजपचे सुभाष गुजरकर हे या सर्कलचे प्रतिनिधित्व करतात. पूर्वी हा भाग जिल्हा परिषदेच्या बहादुरा या सर्कलमध्ये येत होता. या सर्कलचे क्षेत्र आता कमी होणार आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT