विदर्भ

नागपूर : नितीन गडकरींची ‘फटकेबाजी’, धमक्यांना भीक घालत नसल्‍याचे केले स्‍पष्‍ट

अनुराधा कोरवी

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात १०० कोटी रुपयांची खंडणी द्या, अन्यथा जीवे मारू, कार्यालय उडवून देऊ! अशी धमकी आल्यानंतरही नितीन गडकरी यांनी त्याचे पूर्व नियोजित कार्यक्रम सुरू ठेवले आहेत. यानिमित्ताने आपल्या कृतीतून त्यांनी कुठल्याही धमक्यांना भीक घालत नसल्याचे दाखवून दिले आहे.

नितीन गडकरी शनिवारी दिवसभर आणि आज ( दि. १५) आपल्‍या नियोजित कार्यक्रमात व्यस्त राहिले.  त्यांनी 'व्हिएनआयटी' येथील कार्यक्रमात जेष्ठांशी संवाद साधला. गडकरी यांच्या प्रेरणेतून नागपूरमध्ये ८ ते २२ जानेवारी दरम्यान आयोजित खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत शहरातील शांती नगर मैदान येथे सुरू असलेल्या क्रिकेट खेळाचा गडकरी यांनी आनंद घेतला. क्रिकेट खेळत त्यांनी खेळाडूंशी संवाद साधला आणि खेळांडूचा उत्साह वाढविला.

बेळगाव कारागृहातील  कुख्यात गुन्हेगाराने गडकरी यांना धमकीचे फोन केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. नागपूर पोलिसांचे एक पथक बेळगाव कारागृह व्यवस्थापनाच्या मदतीने या घटनेचा छडा लावण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. जयेश नामक या आरोपीला फाशीची शिक्षा देखील सुनावण्यात आली असून हत्या, अपहरण असे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. कारागृहात त्याच्याकडे फोन कसा आला, फोनवर नेमकी कुख्यात दाऊद इब्राहिमच्या नावे गडकरींना धमकी का दिली गेली?, त्याचा कोणत्या गुंड टोळीशी संबंध आहे का? अशा विविध प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासात उघड होणार आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT