नागपूर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील प्रसिद्ध हाॅटेल हाॅटेल व्यवसायी प्रिंस तुली यास अंबाझरी पोलिसांनी मुंबईतून अटक केली. प्रिंस तुली याने १६ मे रोजी तक्रारकर्त्या महिलेच्या घरी जाऊन शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली होती. महिलेशी अनुचित व्यवहार केला आणि आक्षेपार्ह भाषा वापरली. हे सारे सोशल मीडियावर पोस्ट केल्याने महिलेने थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर विनयभंग, शिवीगाळ व धमकी देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रिंस उर्फ प्रिंसीपल तुली नेहमी वादग्रस्त राहिले असून यापूर्वी सी. पी. क्लबच्या व्यवस्थापकाला मारहाण केल्या प्रकरणी सदर पोलिसांनी प्रिंस विरूद्ध गुन्हा दाखल केला होता. घरातील महिला सदस्यांसोबतही असभ्य वर्तन करताना प्रिंसचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. मुंबईतील जे. डब्ल्यू. माॅरियट या पंचतारांकीत हाॅटेलमधून अंबाझरी पोलिसांच्या पथकाने प्रिंस तुलीला अटक केली आहे.