विदर्भ

नागपूर : ग्रामीण भागातील महिला साक्षरतेसाठी वर्ग भरणार

अमृता चौगुले

नागपूर, पुढारी वृत्‍तसेवा : ग्रामीण भागातील कधीही शाळेत न गेलेल्या महिलांना साक्षर करण्याठी जिल्हा परिषदेचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. येत्‍या काही दिवसात महिलांसाठी वर्गही भरणार आहेत. नुकतेच प्रौढ साक्षरता या उपक्रमाकरिता उमेदच्या मदतीने जिल्ह्याच्या १३ ही तालुक्यामधील बचत गटातील एकूण ४५ हजार ५७१ महिलांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. यामध्ये ४ हजारांवर महिलांनी आपले चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षणच पूर्ण केले नसल्याचे समोर आले. तीन हजारांहून अधिक महिलांनी कधीही शाळेत गेल्‍या नाहीत. त्यामुळे या महिलांना साक्षर होण्यासाठी सौम्या शर्मा यांनी प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्या संयुक्‍त विद्यमाने हा उपक्रम घेण्यात येणार आहे.

यामध्ये प्राथमिक शिक्षण न घेतलेल्या महिलांना साक्षर करणे, इयत्ता ५ वी आणि ८ वीपर्यंतचे शिक्षण व इयत्ता १० वी च्या परीक्षेची तयारी अशी उद्दिष्टे समाविष्ट करण्यात आली आहेत. या प्रायोगिक तत्त्वावरील प्रोजेक्टमधील अनुभव व शैक्षणिक साहित्य संदर्भात सर्व विभाग प्रमुख व जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांना प्रथम संस्थेच्या माध्यमातून प्ररिक्षण देण्यात आले. या सर्वांना या उपक्रमाचे तालुक्यानुसार नियोजन करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या.

शिक्षणाचा पुर्नप्रयास या कार्यक्रमात उर्त्स्फूतपणे काम करण्यास इच्छुक असलेल्या स्वयंसेवकांनी जिल्हा परिषद, नागपूरच्या संकेत स्थळावर उपलब्ध असलेल्या लिंकद्वारे नाव नोंदणी करावी असे आवाहन शर्मा यांनी केले आहे. काटोल तालुक्यातील चार गावांमध्ये प्रायोगिक तत्वावर महिलांकरिता साक्षरतेचे वर्ग घेण्यात आले. या साक्षरता वर्गातील अनुभव अतिशय उत्तम होते. महिलांना साक्षर होण्याचे अनेक फायदे आहेत असे शर्मा म्‍हणाल्‍या.

.हेही वाचा 

SCROLL FOR NEXT