नागपूर, पुढारी वृत्तसेवा : विदर्भाचा महत्वाकांक्षी गोसीखुर्द जलपर्यटन व राष्ट्रीय प्रकल्पाची पाहणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या १२ नोव्हेंबर रोजी करणार आहेत. त्यासोबतच भंडारा जिल्ह्यात आयोजित विविध उद्घाटन, लोकार्पण व भूमीपूजन कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. शनिवारी (दि.१२) सकाळी १०.४५ वाजता त्यांचे विशेष विमानाने नागपूर येथे आगमन होणार आहे. त्यानंतर ते गोसीखूर्दला रवाना होतील.
शनिवारी (दि.१२) नोव्हेंबरला पवनी तालुक्यातील गोसीखुर्द धरण हेलिपॅड येथे आगमन व गोसीखुर्द जलपर्यटन तथा प्रकल्पाची पाहणी करतील. दुपारी १२.१५ वाजता गोसेखुर्द धरण हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने भंडारा जिल्ह्यातील शहापूर येथील हेलीपॅडवर उतरुन एम.आय.टी. दुपारी १२. १५ वाजता भंडारा शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. यानंतर विविध लोकार्पण कार्यक्रम व खासदार सुनील मेंढे यांच्या निवासस्थानी भेट आणि नागपुरला रवाना होतील.