विदर्भ

चंद्रपूर : अपघातात सासू-सुनेचा जागीच मृत्यू , तर ६ जण जखमी

मोनिका क्षीरसागर

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा 

चंद्रपूर येथून भावाचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आटोपून घरी परत जात असताना चंद्रपूर-मूल मार्गावरील चिचपल्ली गावजवळ गाडीचा भीषण अपघात झाल्याने, अपघातात सासू-सुनेचा जागीच मृत्यू झाला. सून किरण पारखी (वय 32), सासू शोभा पारखी (वय 65) अशी मृतांची नावे आहेत. ही दुर्घटना आज गुरुवारी (दि.१४) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. तर या अपघातात इतर 6 जण जखमी झाले आहेत.

गुरुवारी (दि.१४) चंद्रपुरात मोठ्या भावाच्या पुण्य स्मरणाचा कार्यक्रम होता. लहान भाऊ पोलीस कर्मचारी अनिल पारखी आपल्या कुटुंबियांसह चंद्रपूरला कालच गुरूवारी आपल्या घरी आले होते. दिवसभर पुण्य स्मरणाचा कार्यक्रम आटोपून घेतला. आज शुक्रवारी (दि.१५) सकाळी कर्तव्यावर रुजू व्हायचे असल्याने, अनिल पारखी काल रात्रीच 10 वाजता कुटुंबियांसोबत चामोर्शीला जायला निघाले. चंद्रपूर मूल मार्गावरील चिचपल्ली गावजवळ पोहचल्यावर वाटेत अचानक जनावर आडवे आल्याने त्यांचे चारचाकीवरील (वाहन क्रमांक Mh 33 V 9688) नियंत्रण सुटले. वाहन चारवेळा पलटी घेत नवीन बांधलेल्या पुलाच्या खाली जावून कोसळले.

अपघात इतका भयंकर होता की, यामध्ये अनिल पारखी यांची पत्नी किरण पारखी, शोभा पारखी यांचा जागीच मृत्यू झाला. तर वाहनात बसलेले घरचे इतर सदस्य पोलीस कर्मचारी अनिल पारखी (वय 40), साधना पारखी (वय 45), राम पारखी (वय 7), आराध्या पारखी (वय 4) , ओम ( वय 10) व नंदिनी (वय 14) हे सहा जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त वाहनातून पारखी कुटुंबियांचे सर्व सामान गाडी खाली पडले. गावालगत अपघात घडल्याने नागरिकांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. काहींना रुग्णालयात हलविण्यात आले. तर जखमींना उपचारासाठी चंद्रपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT