File Photo 
विदर्भ

गुजरात निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला नेण्याचा सपाटा : कुणाल राऊत

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : वेदांत फॉक्सकॉन, टाटा एअर बस पाठोपाठ सॅफ्रन कंपनीचा प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर गेला आहे. या धर्तीवर महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी ट्विट करत राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. यावेळी त्यांनी 'गुजरात निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला नेण्याचा सपाटा भाजपने लावला असल्याचा' आरोप केला. दरम्यान, याबद्दल युथ काँग्रेसने नागपूरमधील मुख्यमंत्री निवासासमोर तीव्र आंदोलनही केले.

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर फक्त विकासकामांवर बोलत असून तरुणांच्या रोजगाराबद्दल काहीही करताना दिसत नसल्याचा आरोप राऊत यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी दिल्ली समोर मुजरा करण्याचे बंद करावे आणि महाराष्ट्राच्या विकासावर भर द्यावा, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच गुजरात राज्याच्या निवडणुका तोंडावर असल्याने भाजपने सर्व मार्गांचा वापर करून अनेक उद्योग गुजरातला पळवण्याचा कार्यक्रम सुरु केला आहे. ही अतिशय गंभीर बाब असून राज्यसरकारने याला बळी न पडता राज्याच्या विकासावर भर देणे अपेक्षित आहे, असेही त्यांनी म्हटले.

नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर उद्योगांबाबत विरोधक आक्रमक होत असून या पार्श्वभूमीवर नागपुरात आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

हे वाचलंत का?  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT