नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : नागपुरातील दयानंद पार्क परिसरात खळबळजनक घटना घडली आहे. एका घरात पती-पत्नी आणि त्यांच्या दहा व चार वर्षाच्या मुलाचे मृतदेह आढळले आहेत ( suicide ). मंगळवारी (दि. १८) सायं. ७ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.
सध्या घटनास्थळी पोलीस पोहोचले असून मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात येत आहे. पतीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. तर पत्नी व दोन्ही मुलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले आहेत. त्यामुळे या घटनेतील गुढ वाढले आहे. तिघांची हत्या करून पतीने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. ( suicide )
पतीचा चायनीज खाद्य पदार्थांचा स्टॉल होता. कर्जबाजारी झाल्यामुळे त्याने असे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे.