विदर्भ

यवतमाळ जिल्ह्यात दमदार पाऊस; आठ मंडळात अतिवृष्टी

नंदू लटके

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : दारव्हा, दिग्रससह केळापूर तालुक्याला पावसाने झोडपले. या तालुक्यात जोरदार पाऊस झाला असून आठ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात सरासरी १७.२ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी ९६३ मिमी आहे. शनिवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी १८१.२ मिमी पाऊस झाला आहे.

गुरुवारी आणि शुक्रवारी पावसाने काहीशी उघडीप दिली होती. मात्र शुक्रवारी (१४ जुलै) रात्रीपासून जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. दारव्हा तालुक्यातील लोही मंडळामध्ये ८५.२५ मिमी पाऊस झाला आहे. तर दिग्रस तालुक्यातील कलगाव आणि तुपटाकळी या दोन मंडळामध्येही अतिवृष्टी झाली असून येथे प्रत्येकी ९७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

नेर तालुक्यातील मालखेड खु. येथे ८७.७५, केळापूर तालुक्यातील पांढर- कवडा येथे ६५.२५ तर पाटणबोरी मंडळात ७१.२५ मिमी पाऊस झाला आहे, पहापळ मंडळात ७२.७५ तर घाटंजी तालुक्यातील घोटी सर्कलमध्ये ६५.५० मिमी पाऊस कोसळला. दारव्हा तालुक्यात ४८.३ तर दिग्रस तालुक्यात ५८.६ मिमी पाऊस कोसळला आहे. केळापूर तालुक्यातही ४८.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यवतमाळ शहरातही शुक्रवारी रात्री अधूनमधून पाऊस कोसळत होता. येथे १५.९ मिमी पाऊस झाला आहे. बाभूळगाव ३.९, कळंब ३.७, आर्णी ३४.३, नेर १६.८, उमरखेड ३.१, महागाव ३.५, वणी ५.८, मारेगाव ६.७, झरी जामणी १६.५, घाटंजी २१.५ तर केळापूर तालुक्यात सरासरी ४८.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT