भरधाव कारने तिघांना उडविले File Photo
गोंदिया

गोंदिया : भरधाव कारने तिघांना उडविले; तीन युवक गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : रस्त्याच्याकडेला बसलेल्या दोन जणांसह एका सायकलस्वाराला भरधाव कारने धडक दिल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गोंदिया पॉलिटेक्निक समोर सोमवारी (दि.२) सकाळच्या सुमारास घडली. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या अपघातामध्ये तीन युवक गंभीर जखमी झाले आहेत. खोमेश उरकुडे (वय.२४ रा. कोसेटोला, गोरेगाव) हेमराज राऊत (वय. ५४ रा. कारंजा) आणि कादीर शेख (वय.३८ रा. फुलचुर ) अशी जखमींची नावे आहे.

स्थानिक पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातच ट्रकचे वाहनतळ आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच ट्रक चालक रस्त्याच्या कडेवरील चायटपरी आदी ठिकाणी बसून असतात. दरम्यान, घटनेच्या वेळी सकाळी गोरेगावकडून गोंदिया कडे येत असलेल्या भरधाव कारने पॉलिटेक्निक कॉलेज पुढील रस्त्याच्या कडेवरील ओट्यावर बसून असलेल्या दोन ट्रक चालकासह त्या ठिकाणाहून जात असलेल्या सायकल स्वारला धडक दिली. तर धडक दिल्यानंतर कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या शेजारी उलटली ज्यात कार चालकही जखमी झाला. या घटनेचा व्हिडीओ परिसरातील सीसीटीव्हीत कॅमेर्‍यात कैद झाला असून घटनेची नोंद पोलिसात झाली नसली तरी याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. सर्व जखमींवर गोंदियाच्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT