Palghar Hit And Run Case| भरधाव कारने दुचाकीस्वाराला उडवले

अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, अपघातानंतर कारचालक पसार
Palghar Hit And Run Case
सागर गजानन पाटीलPudhari
Published on
Updated on

पालघर : मनोर शहर ते मस्तान हमरस्त्यावर हिट अँड रनची घटना घडली. मनोरलगतच्या हात नदी पुलावरील वळणावर गुरुवारी रात्री भरधाव वेगातील कारचालकाने दुचाकीला धडक देऊन पळ काढल्याचे समोर आले आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून त्याची सागर गजानन पाटील (वय २७, रा. चांबळे, ता. वाडा) अशी ओळख आहे. ते दुर्वेस गावच्या हद्दीतील हेरिटेज फूड प्रॉडक्ट कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला असून महामार्गावरील एका हॉटेलच्या पार्किंगमधून ही कार ताब्यात घेतली आहे. पहाटे कार चालकाला ताब्यात घेण्यात आले असून वैद्यकीय चाचणी करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांनी दिली. तर कारचालक सचिन सुरवसे याला ताब्यात घेण्यासाठी हयगय केल्याचा आरोपी मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

सागर पाटील दुर्वेस गावाच्या हद्दीतील हेरिटेज फूड प्रॉडक्ट कंपनीमध्ये कामाला होते. कंपनीमधील ड्युटी संपवून रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या दुचाकीवरून पालघरच्या दिशेने जात होते. मनोर जवळच्या हात नदी पुलालगतच्या वळणावर पोहोचले असता समोरून भरधाव वेगाने आलेल्या स्कॉर्पिओ कार चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी सागर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालकाने अपघात स्थळावरून पळ काढला होता. अपघात स्थळी दाखल झालेल्या मनोर पोलिसांनी अपघात स्थळावरून मृतदेह ताब्यात घेतला आहे.

दुचाकीला धडक देणारी कार ताब्यात घेण्यात आली असली तरी अपघाताला कारणीभूत कारचालकाला ताब्यात घेण्यासाठी मनोर पोलीस कोणतीच हालचाल करीत नव्हते, असा आरोप करून मृत दुचाकीस्वाराच्या नातलगांनी संताप व्यक्त केला आहे. कारचालक मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कारचा मालक शिवाजी गुंजर्डे तर चालक सचिन सुरवसे (वय ३२) नागझरी येथील रहिवाशी आहे. दोघेही दगड खाण चालवत असल्याची माहिती समोर येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news