चोरी आणि बॅग लिफ्टिंग करणार्‍या टोळीतील तिघांना आमगाव पोलिसांनी जेरबंद केले.(Gondia Crime News) Pudhari File Photo
गोंदिया

Gondia Crime News| बॅग लिफ्टिंग टोळीतील तिघांना पाठलाग करून पकडले

पुढारी वृत्तसेवा

गोंदिया : गोंदिया, चंद्रपूर जिल्हयात तसेच छत्तीसगड, मध्यप्रदेश व ओरिसा राज्यात चोरी आणि बॅग लिफ्टिंग करणार्‍या टोळीतील तिघांना आमगाव पोलिसांनी पाठलाग करुन जेरबंद केले. देवा नागय्या पिटला (वय ४२), राजेश राजू पिटला (वय २०) व १२ वर्षीय बालक विधी संघर्ष (रा. नेल्लुर ,आंध्रप्रदेश) अशी आरोपींची नाव आहेत.

आमगाव पोलिस गुरूवारी (दि.१७) भंडारा कारागृहात एका गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला प्रविण अशोक डेकाटे (रा. मोहाडी) या आरोपीला आमगाव पोलिस ठाण्यात चौकशीसाठी शासकीय वाहनातून घेऊन येत होते. दरम्यान नवेगावबांध रेल्वे फाटकाजवळ तीन इसम संशयास्पदरित्या दुचाकीने जात असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र, त्यांची दुचाकी रस्त्याखाली घसरल्याने त्यांनी पळ काढला. पोलिसांनी तिघांचा पाठलाग करुन त्यांना डुग्गीपार येथील तलावाजवळून ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान, तिघांनी आमगाव पोलिस हद्दीत १ लाख ५ हजार रुपयांची चोरी, बिलासपूर जिल्ह्यातील तारबहार पोलिस ठाणे हद्दीत २ लाख ५ हजार रुपये, डोंगरगड पोलिस ठाणे हद्दीत २ लाख रुपये, जंजीर चंपा येथे १ लाख ५ रुपये, बालाघाट जिल्ह्यातील नवेगाव ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत ४.३५ लाख रुपये, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी पोलिस ठाणे हद्दीत ६ लाख ५ हजार रुपये, बिलासपूर जिल्ह्यातील कारभार पोलिस ठाणे हद्दीत दुचाकी चोरी, भुवनेश्‍वर जिल्ह्यातील चंद्रपूर पोलिस ठाणे हद्दीत १ लाख ५ हजारांची चोरी केल्याचे कबुल केले.

याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून विधी संघर्ष यास बाल सुधार गृहात दाखल करण्यात केले आहे. त्यांच्याकडून दुचाकी, दुचाकी तोडण्याचे लोखंडी साहित्य, ३४ हजार ३०० रोख व एक मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपी हे आंतरराज्यीय सक्रिय टोळीतील चोरटे असल्याने त्यांचेकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमगाव पोलिस पुढील तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT