गोंदिया शहरातील मुस्लीम समाजाने शहरातून मोर्चा काढून निषेध नोंदविला. Pudhari News Network
गोंदिया

गोंदियात रामगिरी महाराजांच्या निषेधार्थ मुस्लीम समाजाचा मोर्चा

पुढारी वृत्तसेवा

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : रामगिरी महाराज यांनी मुस्लीम समाजाच्या धर्मगुरूसंबंधी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज (दि. २३) गोंदिया शहरातील मुस्लीम समाज बांधवांनी शहरातून मोर्चा काढून निषेध नोंदविला. दरम्यान, शहर पोलिसांना रामगिरी महाराज यांना तातडीने अटक करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.

मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूयांच्या विषयी 16 ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यामध्ये आयोजित सप्ताहाच्या कार्यक्रमांमध्ये रामगिरी गुरुनाथ महाराज यांनी प्रवचनादरम्यान अपशब्द वापरल्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.

दरम्यान, समस्त मुस्लिम समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना आज गोंदियात मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. यानंतर मोर्चेकरूंनी स्थानिक शहर पोलीस ठाण्यात धडक दिली. यावेळी एका शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांना निवेदन सादर करून रामगिरी महाराजांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. मोर्चात हजारोच्या संख्येने मुस्लिम समाज बांधव सहभागी झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT