Nag Panchami 2024 | गोंदिया जिल्ह्यात 8 विषारी सापांसह 30 प्रजाती

5 प्रजाती निम विषारी, सर्वाधिक संख्या बिन विषारी सापांची
30 species including 8 venomous snakes in the district
जिल्ह्यात 8 विषारी सापांसह 30 प्रजातीPudhari Online
Published on
Updated on

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : प्रमोदकुमार नागनाथे

सद्यस्थितीत अख्ख्या जगभरात सापांच्या सुमारे अडीच हजार जाती असून भारतात केवळ 340 जाती आढळतात. तर महाराष्ट्राचा विचार केला तर केवळ 52 प्रजातीच आढळतात. त्यापैकी अवघ्या 12 प्रजाती विषारी आहेत. (Nag Panchami 2024)

30 species including 8 venomous snakes in the district
Sikkim Earthquake | सोरेंगमध्ये ४.४ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का

जिल्ह्याचा एकंदर विचार करता साधारण 30 जातींचे साप आढळतात. त्यातील 8 जातीचेच साप विषारी असून 5 साप निम विषारी तर उर्वरित बिनविषारी आहे. साप हा तसा शेतकऱ्यांचा मित्रच. त्यामुळे सापांना मारू नये, असे आवाहन सर्पमित्र, वन्यजीव संरक्षकांकडून करण्यात येत आहे.

सापांची विषारी आणि निम विषारी व बिनविषारी वर्गवारी असते. बिनविषारी साप हे संख्येने जास्त आहेत. ते चावले तरी मनुष्याचा मृत्यू होत नाही. टीटीचे इंजेक्शन घेतले तरी पुरेसे आहे. विषारी साप चावल्यास योग्य उपचार न मिळाल्यास मृत्यू ओढवला जातो.

विषारी सापाचा दंश झाल्यास विषाचा उतारा म्हणून अँटीवेनिन इंजेक्शन दिले जाते. चिन्ह अर्थात दंशाची तपासणी केल्यानंतरही साप विषारी की बिनविषारी हे ओळखता येते. दोन दात लागलेले दिसले तर अँटीवेनिन इंजेक्शन दिले जाते.

जिल्ह्यात विषारी जातीचे 8 प्रमुख साप आढळतात. त्यात नाग (गवाऱ्या), खुरीनाग, मण्यार (दांडेकार), पाटेरी मण्यार, घोणस (टवऱ्या), फुरसे, चापडा, तनसर्प, रातसर्प (पोवळा) या प्रजातींचा समावेश आहे.

त्यापैकी फुरसे हा दुर्मिळ साप आहे. तसेच मांजऱ्या, फोस्टेंन मांजऱ्या, उडता सोनसर्प, हरणटोळ, ब्राऊन वाईन स्नॅक हे निम विषारी साप असून अजगर, तस्कर, कवड्या, पट्टेरी कवड्या, पानदिवड (धोंड्या), धामण, गवत्या, धुळ नागीन, डुरक्या घोणस (मुकी मांडवल), मांडोळ, कुकरी, नानेटी (वास्या), विरोळा (तास्या), डोंगरवेल्या, वाळा, चंचुमुखी वाळा, काळतोंड्या हे बिन विषारी जातीचे साप जिल्ह्यात आढळतात.

सापांबद्दल समाजात अंधश्रद्धा...

समाजात सापांबद्दल अनेक गैरसमज व अंधश्रद्धा असून सापाच्या डोक्यावर मणी असतो, सापाला केस असतात साप धनाचे रक्षण करतो, साप पाठलाग करतो, साप पुंगीवर नाचतो, साप बदला घेतो, साप दूध पितो, विशिष्ट सापामुळे धन लाभ होतो. या अंधश्रद्धा आहेत.

विषारी साप कसे ओळखणार ?...

नाग (गवाऱ्या) : जो फना काढून उभा राहतो तो नाग, जोरात फुत्कार, फुस्स असा सारखा आवाज आल्यास जवळ नाग आहे असे समजावे.

● खुरी नाग : हे सर्प नागाच्या जातीचेच सर्प आहे. व नागप्रमाणेच फना काढतो. मात्र, खुरी नागाच्या फनावर खुरीप्रमाणे निशान असतो.

● मण्यार (दांडेकार) काळपट नीळसर रंग. अंगावर पांढरे पट्टे, शेपटीकडे अधिक डोक्याकडे कमी होत जातात हा साप इतर सापांना खातो.

पाटेरी मन्यार : हा साप दांडेकार प्रमाणेच हलका काळसर व अंगावर पांढरे पट्टे असतात.

30 species including 8 venomous snakes in the district
दहशतवादी सलीम कुत्ता पार्टी प्रकरण : बडगुजर तडीपारीविरोधात आज मांडणार बाजू

फुरसे : फूटपट्टी एवढी लांबी, शरीरावर वेलबट्टी सारखे नक्षीकाम, डोक्यावर बाणासारखी खूण. दंश करताना जिलेबीसारखा आकार करून शरीर एकमेकावर घासतो आणि करवतीसारखा करकर आवाज करतो.

घोणस, (टवऱ्या) : हा साप कुकरच्या शिट्टीचा आवाज काढतो. अंगावर साखळीसारखे काळ्या रंगाचे टिपके असणाऱ्या रेषा असतात, डोक्यावर इंग्रजी व्ही अक्षर असते.

चापडा तनसर्प: या सापाचा रंग हिरवा असतो व अंगावर काळपट नक्षीकामसारखे चिन्ह असून, हा दिसायला थोडाफार गवत्या सापासरखा असला तरी विषारी साप आहे. या सापाचे डोके व्ही आकाराचे असते.

रातसर्प (पोवळा): या सापाचा रंग हल्का सोनेरी ब्राऊन रंगाचा असून काळतोंड्या सापाप्रमाणे या सापाचा तोंडाचा भाग काळा असतो तर अंगावर कसलेच चिन्ह राहत नाही.

सापांना मारू नका...

सर्प हे आपल्या परिस्थितीक तंत्रचा महत्त्वपूर्ण अंग आहे. आणि तो आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडत आहे. जसे उंदरांची संख्या नियंत्रण, काही साप इतर सापांना खाऊन त्यांच्या संख्येवर सुद्धा नियंत्रण ठेवतात. खूप कमी प्रजातीचे साप मानवी वस्ती जवळ राहतात. याउलट आपणच त्यांचा क्षेत्रात अतिक्रमण करत आहोत, आणि त्यांचा जीव घेत आहोत. आपल्या अनेक धर्मात सुद्धा सापांना आदराचे स्थान दिले आहे, त्यांचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. साप हे आपले मित्रच आहेत, त्याचे रक्षण करा, जर एखादा सर्प चुकीने आपल्या घरी आला तर वनविभाग किंवा जवाबदार सर्पमित्रांची मदत घ्यावी.

इंजि. सचिन पटले, पर्यावरण मित्र

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news