गोंदिया

गोंदिया : जहाल माओवाद्याचे गोंदियात आत्मसमर्पण

करण शिंदे

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : देशातील माओवादी चळवळीला प्रतिबंध व्हावा. अधिकाधिक माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता तसेच त्यांचे सामाजिक आणि आर्थिक पुनर्वसन व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत "नक्षल आत्मसमर्पण योजना" राबविली जात आहे. या धरतीवर संजय उर्फ बिच्छेम पूनेम (वय 25 रा. पुसनार, ता. गंगालूर) असे आत्मसमर्पित नक्षल्याचे नाव असून त्याचेवर शासनाने 7 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. अशी माहिती आज, (ता. 19) जिल्हा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.

जिल्हा पोलीस प्रशासनाकडून माओवाद्यांना आत्मसमर्पण करण्याकरीता केलेले आवाहन केले होते. तसेच माओवादी संघटनेच्या अत्याचाराला कंटाळून माओवादी संघटनेत सक्रिय सहभाग असलेल्या प्लाटून पार्टी कमिटी मेंबर जहाल माओवाद्याने (दि.3) जून रोजी गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या समक्ष आत्मसमर्पण केले.

दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांच्या मार्गदर्शनाखाली माओवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्याकरीता जिल्ह्यात प्रभावी नक्षल विरोधी अभियान राबविण्यात येत असून विविध उपक्रम राबवून शासनाच्या कल्याणकारी योजनांची जनतेला, नागरिकांना माहिती देवून जनजागृती करण्यात येत आहे.

या नक्षल कारवायांमध्ये होता सहभाग

आत्मसमर्पित माओवादी संजय उर्फ बीच्चेम याने ऑक्टोंबर 2013 मध्ये गंगालुर दलम मध्ये भरती होऊन माड एरिया मध्ये कंपनी क्र. 7 व 10 मध्ये जहाल माओवादी पहाडसिंग याचा अंगरक्षक म्हणून काम सांभाळले, तसेच दर्रेकसा एरिया कमिटी, प्लॉटून -1, व (सी.एन. एम.) चेतना नाट्य मंचमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर सन 2017-18 मध्ये प्लॉटून-1 मध्ये कार्यरत असताना गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत मुरकुटडोह, टेकाटोला, तसेच चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत कोसबी जंगल परिसरात घडलेल्या नक्षल पोलीस चकमकीत सक्रिय सहभाग घेवून चकमक घडवून आणली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT