Five years imprisonment for accused in case of outraging the modesty of a woman
महिलेच्या विनयभंग प्रकरणी आरोपीला पाच वर्षाचा कारावास  File Photo
गोंदिया

गोंदिया : महिलेच्या विनयभंग प्रकरणी आरोपीला पाच वर्षाचा कारावास

पुढारी वृत्तसेवा

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : घरामध्ये महिला एकटी असल्याचा फायदा घेवून तिच्यावर विनयभंग करण्याची घटना 17 ऑक्टोबर 2021 घडली होती. या प्रकरणी गोंदियाच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने निकालात आरोपीला दोषी ठरवत 4 वर्षे साधा व एक वर्ष सश्रम अशी पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. हेमराज उर्फ हेमु ब्रिजलाल वाधवानी (वय.58 रा. हरीकाशी नगर, गोंदिया) असे आरोपीचे नाव आहे.

तीन वर्षापूर्वी 17 ऑक्टोबर 2021 दिवशी पिडीत महिलेला एकटी पाहून आरोपी हेमराज उर्फ हेमू वाधवानीने तिचा विनयभंग केला होता. या प्रकरणी फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरुन गोंदिया शहर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. आरोपी हेमराज उर्फ हेमु वाधवानी यास अटक करुन सबळ साक्ष पुरावे गोळा करण्यात आले. दरम्यान, तपासी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक प्राजक्ता पवार यांनी सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन तपासाअंती आरोपीविरुध्द मुख्य न्यायदंडाधिकारी, न्यायालय गोंदिया येथे दोषारोपपत्र सादर केले.

या चालवलेल्या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता कमलेश दिवेवार यांनी युक्तिवाद केला. दरम्यान, न्यायालयात खटल्याचे सुनावणीत आरोपी विरूध्द सबळ साक्ष पुराव्यावरून दोष सिध्द झाल्याने बुधवारी (दि. 10) मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजित कुलकर्णी यांनी आरोपी हेमराज उर्फ हेमू पाच वर्षे कारावास आणि 12 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात कोर्ट पैरवी कामकाज पोलीस हवालदार ओमराज जामकाटे, पोलीस शिपाई किरसान यांनी केले.

SCROLL FOR NEXT