परभणी: पाठलाग करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरुणाविरूद्ध गुन्हा

आडगाव लासीना ते पूर्णा रस्त्यावरील घटना
Molestation of a minor girl
आडगाव लासीना येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला.Pudhari File Photo

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: आडगाव लासीना येथील एका सोळा वर्षीय मुलीचा १ ते ५ जुलै दरम्यान पाठलाग करुन लज्जास्पद असभ्य गैरवर्तन केले. या प्रकरणी वसंत जाधव (वय २५) या तरुणाविरोधात पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Molestation of a minor girl
परभणी: कनका येथील भाविकांची जीप पलटी होऊन २ जण ठार; ८ जण जखमी

वसंत जाधव सतत पाठलाग करत होता

याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील आडगाव लासीना येथील एक सोळा वर्षीय मुलगी पूर्णा येथील एका महाविद्यालयात शिकत आहे. ती महाविद्यालयात जाताना तिचा वसंत जाधव सतत पाठलाग करत होता. तसेच अश्लील भाषेत संभाषण करुन लज्जास्पद गैरवर्तन करत होता. या प्रकरणी तरुणीने पूर्णा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर महिला सपोनि रेखा शहारे यांनी तरुणाविरूद्ध गुन्हा दाखल केला.

Molestation of a minor girl
परभणी -ताडकळस ते महातपुरी शिवरस्ता खुला करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर दगडफेक

या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दर्शन शिंदे करीत आहेत. दरम्यान, अशा घटनेमुळे ग्रामीण भागातून शहरातील शाळा, महाविद्यालयात शिक्षणासाठी येजा करणा-या विद्यार्थिंनीमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या प्रकारांना आळा घालण्याची मागणी पालक वर्गांतून केली जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news