गणखैरा येथील सरपंच संतोष आदमने यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला.  Pudhari News Network
गोंदिया

Gondia News : रेल्वेच्या धडकेत गणखैराचे सरपंच ठार

पुढारी वृत्तसेवा

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : गोरेगाव तालुक्यातील गणखैरा येथील सरपंच संतोष आदमने हे शेतीची कामे करून घरी परत जात असताना रेल्वेगाडीच्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि. 2) दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेमार्गावर गणखैरा गावशिवारात घडली.

मालगाडीने चिरडत नेले

संतोष आदमाने यांची गावालगत शेती असून शेतात खरीप हंगामातील भात रोवणीची कामे सुरू असल्याने ते शेताकडे गेले होते. दरम्यान, त्यांच्या शेताजवळूनच गोंदिया - चांदाफोर्ट रेल्वेमार्ग असून दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ते रेल्वेरुळ ओलांडत असताना चंद्रपूरकडून गोंदियाच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीने त्यांना चिरडत नेले. ज्यामध्ये त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

गणखैरा गावात शोककळा पसरली

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान, घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांना देण्यात आली. सरपंच संतोष आदमाने यांच्या अपघाती मृत्यूमुळे गणखैरा गावात शोककळा पसरली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT