गोंदिया : लेखापाल लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

अडीच हजाराची लाच घेताना अटक
bribe case one arrested
लेखापाल लाच घेताना एसीबीच्या जाळ्यातPudhari File Photo
Published on
Updated on

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : गोरेगाव येथील तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयातील कंत्राटी लेखापाल याला कंत्राटी आरोग्य सेविका यांच्याकडून प्रोत्साहन भत्ता काढून देण्यासाठी अडीच हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी (दि.1) दुपारी 4 च्या सुमारास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गोंदियाच्या पथकाने केली. सुरेश रामकिशोर शरणागत (वय 36) लेखापाल (कंत्राटी), तालुका नियंत्रण पथक, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय गोरेगाव असे लाचखोर लेखापालाचे नाव आहे.

bribe case one arrested
बीड : शिक्षकाकडून लाच घेताना मुख्याध्यापक 'एसीबी'च्या जाळ्यात

तक्रारदार या तालुक्यातील चोपा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या गिधाडी येथील उपकेंद्रात कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून कार्यरत असून त्यांना शासनाकडून 16 हजार 500 रूपयाचे ईंसेंटीव्ह देण्यात येणार होते. दरम्यान, त्यांनी आरोपी लेखापाल यांच्याकडे सदर प्रोत्साहन भत्ता काढून देण्याकरीता विनंती केली होती. मात्र संशयित आरोपीने सदर प्रोत्साहन भत्ता काढून दिल्याच्या मोबदल्यात फिर्यादीकडे 3 हजार रूपये लाचेची मागणी केली. परंतू तक्रारदार यांना लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार नोंदवली. या अनुषंगाने पथकातर्फे गुरुवारी (दि.1) सापळा रचत कारवाई केली. लाच मागणी पडताळणीदरम्यान आरोपीला पंचासमक्ष तडजोडीअंती 2 हजार 500 रूपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

bribe case one arrested
Dhule Bribery case: ४ हजारांची लाच घेताना ग्रामविकास अधिकाऱ्यासह चौघे 'ACB' च्या जाळ्यात

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलीस अधीक्षक सचीन कदम, पर्यवेक्षक अधिकारी पोलीस उप अधीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उमाकांत उगले, पोलीस निरीक्षक अतुल तवाडे, सहायक फौजदार करपे, पोलीस हवालदार संजयकुमार बोहरे, मंगेश काहालकर, नायक पोलीस शिपाई संतोष शेंडे, संतोष बोपचे, कैलास काटकर अशोक कापसे, प्रशांत सोनवाने, महिला नायक पोलीस शिपाई संगीता पटले, रोहिणी डांगे, चालक नायक पोलीस शिपाई दिपक बाटबर्वे यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news