Accident News Pudhari
गोंदिया

Gondia Accident | गोंदिया–बालाघाट मार्गावर ट्रक - पिकअपची समोरासमोर धडक : 6 कामगार ठार,  9 जण गंभीर जखमी

नागराजवळ भीषण अपघात, सर्व मृत आणि जखमी मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील रहिवासी

पुढारी वृत्तसेवा

Gondia Balaghat Road Accident Workers Dead

गोंदिया: गोंदिया–बालाघाट मार्गावरील नागरा उड्डाणपूलाजवळ मध्यरात्री एक अत्यंत भीषण रस्ता अपघात घडला. भरधाव ट्रक आणि कामगारांना घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनात समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत पिकअपचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या दुर्घटनेत 6 कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून 9 जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातातील सर्व मृतक आणि जखमी  हे मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात हे मजूर पिकअप वाहनाने हैदराबाद कडे निघाले होते. मात्र, गोंदिया–बालाघाट मार्गावरील नागरा उड्डाणपूलाजवळ काळाने त्यांच्यावर झडप घातली. विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली.

अपघाताचा भीषण आवाज होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच गोंदिया ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वाहनात अडकलेल्या आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने तातडीने बाहेर काढण्यात आले.

सर्व जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT