खाणीत पोहायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. Pudhari News Network
गोंदिया

गोंदिया : खाणीत पोहायला गेलेल्या १० वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

गोंदिया : गावाबाहेर असलेल्या खाणीत पोहायला गेलेल्या दहा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना रविवारी (दि.२१) सकाळी ११ च्या सुमारास अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पिंपळगाव/खांबी येथे घडली. रजनिश वामन शिवनकर (वय १०) असे या मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अर्जुनी मोरगाव तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. तर गावागावातील खड्डे व गावाबाहेरील मुरमाच्या खाणी पाण्याने तुडूंब भरलेल्या आहेत. तालुक्यातील पिंपळगाव/ खांबी येथील वामन शिवनकर यांची दोन्ही मुले अन्य मुलांसोबत पटाची दान परिसरात फिरायला गेले होते. या परिसरात मुरमाच्या मोठमोठ्या खाणी असून मुसळधार पावसाने तुडूंब भरले आहेत. या खाणीत ही मुले आंघोळ करण्यासाठी उतरले. यामध्ये रजनिश वामन शिवनकर हा दहा वर्षाचा मुलगा खोल पाण्यात उतरल्याने तो बुडू लागला. तो बुडत असल्याचे निदर्शनास येताच मोठ्या भावाने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश आले नाही. त्यामुळे घाबरलेली मुलांनी गावात येवून लोकांना याची माहिती दिली. गावकऱ्यांनी घटनास्थळी येऊन खाणीत मुलाचा पाण्यात शोध घेत त्याचा मृतदेह बाहेर काढला. घटनेची माहिती मिळताच अर्जुनी मोरगाव पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी-मोरगाव येथे पाठविण्यात आला. मुलाच्या दुर्देवी मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT